रायगडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात, जिल्ह्याकरिता तातडीने ३० लाख रूपयांचा विशेष निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:27 AM2018-08-16T02:27:47+5:302018-08-16T02:27:54+5:30

जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचावकार्यासाठी लवकरच एन.डी.आर.एफ च्या धर्तीवर सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे.

Independent day in Raigad, special fund of Rs. 30 lakhs for the district promptly | रायगडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात, जिल्ह्याकरिता तातडीने ३० लाख रूपयांचा विशेष निधी

रायगडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात, जिल्ह्याकरिता तातडीने ३० लाख रूपयांचा विशेष निधी

Next

- आविष्कार देसाई
अलिबाग : जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचावकार्यासाठी लवकरच एन.डी.आर.एफ च्या धर्तीवर सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी तातडीने ३० लाख रुपये निधी देण्यात येत असल्याचे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. चव्हाण यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावरील मुख्य सरकारी समारंभात ध्वजारोहण व ध्वजवंदना करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित या शानदार समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा न्यायाधीश सेवतीकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीधर बोधे, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेणमध्ये स्वातंत्र्यदिन
पेण : स्वतंत्र भारताचा ७२ वा स्वांतत्र्य दिन पेणमध्ये उत्साहित पार पडला. पेणच्या पेण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अजय पाटणे यांनी राष्टÑध्वजाला मानवंदना दिली. तर नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष दीपक गुरव यांनी ध्वजारोहण केले.
पेण पंचायत समितीमध्ये सभापती सीमा पेणकर यांनी ध्वजारोहण केले. याशिवाय पेण पोलीस ठाणे, आरटीओ व शाळा, कॉलेजमध्ये तेथील संस्था प्रमुखाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्राथमिक मराठी शाळांच्या पहाटेच प्रभात फेऱ्या निघाल्या होत्या भारत माता की जयचा जयघोष दुमदुमत होता. ध्वजारोहणानंतर राष्टÑगीत, देशभक्तीपर गीते या समूह गीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. एकंदर या राष्टÑीय सणांचे धूमधडाक्यात सादरीकरण पेणमध्ये सर्वच ठिकाणी करण्यात आले.

नितीन जाधव यांना पोलीस पदक प्रदान
पेण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन केशवराव जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक, सन्मानचिन्ह देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

परेड दरम्यान चक्कर
पोलीस परेड मैदान येथे मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्र म सुरू असताना पोलीस दलातील चार महिला आणि तीन पुरु षांना अचानक चक्कर आली.
सकाळपासूनच पोलीस जवान कार्यक्र मस्थळी आले होते, त्यामुळे त्यांच्यावर ताण आल्याचे बोलले जाते. घटनास्थळी असलेल्या १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी चक्कर आलेल्या पोलिसांची तपासणी केली. त्यांना थकवा आल्याने चक्कर आल्याचे त्यांनी सांगितले.

१२९ कोटी ८५ लाख रुपयांचे खरीप पीक कर्जवाटप
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १८ हजार ७३ शेतकºयांना ४१ कोटी सात लाख २७ हजार रु पयांची कर्जमाफी देण्यात आली. तर १९,३५६ नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत एक कोटी ९१ लाख २६ हजार रु पयांच्या व्याज सवलतीचा लाभ देण्यात आला. या कर्जमाफीमुळे या वर्षीच्या खरीप हंगामात कर्ज घेण्यासाठी अनेक शेतकरी पात्र ठरले. या वर्षी २५ हजार ५७९ शेतकºयांना तब्बल १२९ कोटी ८५ लाख १७ हजार रुपयांचे खरीप हंगामासाठी पीक कर्जवाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुद्रा योजनेचे यंदा ५२३३ लाभार्थी
मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान यासारख्या योजनांमुळे कृषी उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत ५२३३ लाभार्थ्यांना ६४ कोटी ८९ लाख रु पयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. जिल्ह्यातील जनतेला आॅनलाइन दाखले देण्यास सुरु वात झाली आहे. स्वस्त धान्य दुकानात पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशिनद्वारे धान्य वितरणास सुरु वात झाली आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. जिल्हा लवकरच कुपोषणमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युवा माहितीदूत उपक्र मात सहभागी होण्याचे आवाहन
१जिल्ह्यातील जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचाव्यात, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आजपासून युवा माहितीदूत हा उपक्र म सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी त्यात सहभागी होऊन या सेवा उपक्र माद्वारे उपेक्षित घटकांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, असे आवाहन चव्हाण यांनी केले. या प्रसंगी चव्हाण यांच्या हस्ते युवा माहितीदूत या उपक्र माच्या लोगोचे अनावरण तसेच पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील मुद्रा बँक योजनेतील यशकथांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही प्रकाशन चव्हाण यांनी केले.

 
सामाजिक परिवर्तन प्रकल्प, ५६ गावांत परिवर्तन
२या वेळी पोलीस बॅन्डच्या तालावर राष्ट्रगान होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. विविध लोकाभिमुख योजना राबवून महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण जनता, महिला या सर्व घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. विकासाचा समतोल साधण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे वर्षभरातच निवडलेल्या ५६ गावांमध्ये सामाजिक परिवर्तन दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.


मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा प्रतिसाद
 
कर्जत : कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, यंदा उपस्थिती लक्षणीय होती. मध्यरात्रीच्या झेंडावंदनाचे हे तेरावे वर्ष आहे.
कर्जतच्या स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात १४ आॅगस्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. चौकाच्या नामफलकाला भास्कर बाविस्कर यांनी पुष्पहार अर्पण केला आणि ठीक १२ वाजून २ मिनिटांनी जे. एम. मिर्झा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी अध्यक्ष श्रीराम पुरोहित, विजय मांडे, सुनील दांडेकर, वैदेही पुरोहित आदी उपस्थित होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, मुकेश पाटील, नितीन परमार, सुनील गोगटे, महेंद्र चंदन, राजाभाऊ कोठारी, संदीप पारकर, तानाजी बैलमारे, वसंत मोधळे, शैलेश सातपुते, राजेंद्र दगडे, ज्ञानेश्वर वाडिले, रमाकांत जाधव, रामदास गायकवाड, मंदार दगडे, असिफ मिर्झा, राजेश गायकवाड, मुफद्दल डाभिया, हुसेन जमली, अशोक गायकवाड, विवेक वाडकर, सिद्धार्थ डाळिंबकर, अमीर मणियार, नवाझ पठाण, संदीप मानकामे आदी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१७-२०१८
गुणवंत खेळाडू पुरु ष
कुथे भागेश जगदिश
खेळ : जलतरण (वॉटरपोली)
खेळाडू पुरस्कार (दिव्यांग)
देवकर विनोद सुरेश
खेळ- पॉवरलिफ्टिंग
खेळाडू पुरस्कार (महिला)
गुगळे राजश्री राजू,
खेळ : जलतरण (वॉटरपोली)
क्र ीडा मार्गदर्शक पुरस्कार
देसाई संदीप परशुराम
खेळ-कबड्डी,
जिल्हा युवा पुरस्कार
पाटील सोनू मच्छिंद्र (युवती),
जिल्हा युवा पुरस्कार
वनवासी आदिवासी विकास सेवा संघ माजगाव, ता. मुरु ड.
प्रीवॉटर कप स्पर्धा
मौजे देवळे, ता. पोलादपूर, मौजे आडावळे खुर्द, ता. पोलादपूर आणि मौजे कापडे बुद्रुक, ता. पोलादपूर


राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
इयत्ता दहावीसाठी, संकेत राजेंद्र पोतदार, डे.ए.व्ही. पब्लिक स्कूल प्रायमरी इंजिनीअर, फेहमीन फर्झन देशमुख, समर्थ रामदास सेकंडरी, दीप सुशील गांधी, को.ए.सो. इंग्लिश मिडी. सेकंडरी स्कूल, अलौकिक कुमार वर्मा, डे.ए.व्ही. इंटरस्कूल खारघर, साक्षी संजय ए. पाटील, अपीजय स्कूल खारघर, चेतन केशव घोडके, अपीजय स्कूल खारघर, अखिल अनिल अहिरे, बालभारती पब्लिक स्कूल खारघर, श्रीष्टी रमेश दारकुंडे, श्रीम. सुमतीबाई देव प्रायमरी स्कूल.


शिष्यवृत्ती परीक्षा
पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) फेब्रुवारी २०१८ मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी श्रेयस राहुल पाटील, सेंट जोसेफ हायस्कूल सीबीएसई पनवेल (पाचवी), अथर्व संभाजी खोत, रायगड जिल्हा परिषद स्कूल रिंगीचा कोंड (पाचवी), सिद्धेश संजय पाटील, एन.एम. जोशी विद्याभवन गोरेगाव आठवी.

Web Title: Independent day in Raigad, special fund of Rs. 30 lakhs for the district promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.