पालकमंत्री येताच रुग्णालयात धावाधाव, प्रमुख डॉक्टर गैरहजर असल्याने झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:01 AM2019-05-15T00:01:51+5:302019-05-15T00:02:02+5:30

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबागमधील सरकारी रुग्णालयाच्यातील समस्या लोकमतने अनेकदा प्रसिद्ध केल्या आहेत.

The Guardian Minister will be scouting for the hospital | पालकमंत्री येताच रुग्णालयात धावाधाव, प्रमुख डॉक्टर गैरहजर असल्याने झाडाझडती

पालकमंत्री येताच रुग्णालयात धावाधाव, प्रमुख डॉक्टर गैरहजर असल्याने झाडाझडती

Next

- जयंत धुळप

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबागमधील सरकारी रुग्णालयाच्यातील समस्या लोकमतने अनेकदा प्रसिद्ध केल्या आहेत. याची दखल घेऊन, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता रु णालयाला सकाळी १० वाजता भेट दिली. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली.
केस पेपर काढण्याकरिता रुग्णांची मोठी रांग तर प्रमुख डॉक्टर गैरहजर असल्याचे यावेळी दिसून आले. त्यांना तातडीने निरोप दिला तरी अनेक डॉक्टर वेळात रुग्णालयात पोहोचले नाही, याची दखल चव्हाण यांनी घेतली. जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी हे देखील रुग्णालयात नव्हते, तर त्यांच्याऐवजी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल फुटाणे उपलब्ध होते.
रुग्णांना केस पेपर मिळण्यास विलंब लागत असल्याची पाहणी केली असता, तीनपैकी एकच खिडकी सुरू असल्याचे दिसून आले. याशिवाय नेत्र विभाग, अपघात विभाग, पुरुष रुग्ण कक्ष येथेही कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसले.
चव्हाण यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन तक्रारी जाणून घेण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अ‍ॅड.अंकित बंगेरा आदी उपस्थित होते.
संतापयुक्त तक्रारी गांभीर्याने जाणून घेतल्या. जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस कक्षास भेट देऊन आवश्यक सुविधा देण्याकरिता युनिटच्या प्रमुख डॉ. दीपाली देशमुख यांना आश्वासित केले.

सेवाभावी डॉक्टरांचा राज्यस्तरीय गौरव
जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी आहे, पदे रिक्त आहेत, त्याबाबत शासनस्तरावरून आवश्यकती कार्यवाही करण्यात येईलच, परंतु अलिबाग शहर व परिसरातील खासगी डॉक्टर्स रुग्णसेवा देण्याकरिता जिल्हा रुग्णालयास वेळ देण्यास तयार आहेत. अशा सेवाभावी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांची सेवा उपलब्ध करून देण्याकरिता सुयोग्य नियोजन करण्यात येईल आणि अशा डॉक्टरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

रुग्णकल्याण समितीत ५० सदस्य
रुग्णालयाची नवीन रुग्ण कल्याण समिती विविध क्षेत्रातील तब्बल ५० सदस्यांची करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर लोकसहभागातून सुटू शकणाºया समस्या संबंधित डॉक्टरांनी समिती सदस्यांच्या संपर्कात राहून सोडवता येतील, रुग्णालयात स्वच्छता राखण्याकरिता आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून घेण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत.

लोकसहभागयुक्त पारदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब
१‘लोकमत’ने जिल्हा रुग्णालयाबाबत मांडलेल्या समस्यांची आठवण करून चव्हाण यांनी, आरोग्य व्यवस्था चांगली करण्याकरिता लोकसहभागयुक्त पारदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करून राज्यात आरोग्य सेवेचा नवा रायगड पॅटर्न तयार करू असा विश्वास व्यक्त केला.
२रुग्णालयात दररोज सुमारे ६०० रुग्ण जिल्हाभरातून उपचार घेण्याकरिता येतात. त्यांना सत्वर केसपेपर उपलब्ध होण्याकरिता तिन्ही खिडक्यांवर तीन कर्मचारी सत्वर कार्यरत होतील. केसपेपर रुग्णास प्राप्त झाल्यावर त्याला कोणती उपचार पद्धती आणि ती कोणत्या डॉक्टरांकडे मिळेल याबाबतचे जॉब कार्ड सकाळी १०.३० वा. तयार होईल व तो रुग्ण संबंधित डॉक्टरांकडे रवाना होईल.
३जॉब कार्डच्या आधारे रुग्णांचे नाव, गाव, व त्याचा मोबाइल नंबर अशी संगणकात तयार होणारी सूची (डेटा) ईमेलद्वारे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पत्रकार व सर्वपक्षीय विविध पदाधिकारी अशा १०० जणांना ईमेलद्वारे दररोज पाठविला जाईल. स्वत: पालकमंत्री रुग्णांशी संपर्क करून मिळणाºया आरोग्य सुविधांबाबत चौकशी करणार आहेत.

Web Title: The Guardian Minister will be scouting for the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड