गौरीपाडा तलावाची संरक्षक भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 05:15 AM2018-11-11T05:15:46+5:302018-11-11T05:16:17+5:30

जीवितहानी नाही : बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह, ठेकेदारासह अधिकाऱ्याची चौकशीची मागणी

The guard wall of Gauripada lake collapses | गौरीपाडा तलावाची संरक्षक भिंत कोसळली

गौरीपाडा तलावाची संरक्षक भिंत कोसळली

Next

चिकणघर : कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा येथील कर्नाळा तलावाची संरक्षक भिंत झाडांसकट शुक्र वारी मध्यरात्री १२.१५ च्या दरम्यान अचानक कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. २०१४ मध्ये या भिंतीचे बांधकाम झाले होते. अवघ्या चार वर्षांतच भिंत कोसळल्याने तिच्या बांधकामाविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे.

कर्नाळा तलावाची ही भिंत १०५ फूट लांब आणि पाच फूट रुंद होती. तलाव परिसरात सकाळ-सायंकाळी नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. कठड्यावर बसण्यासाठी त्यांची गर्दी होते. परंतु, भिंत कोसळण्याची घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. पदपथाला एका बाजूला आणखी तडे गेल्याने भिंतीचा आणखी काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. सध्या येथील कर्नाळादेवी मंदिरात पहाटेपासून भजन सुरू आहे. तेथे सकाळी दर्शनास येणाºया भाविकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ दोर बांधून बघ्यांना भिंतीजवळ जाण्यास अटकाव केला. भिंतीची त्वरित पुनर्बांधणी न केल्यास तेथे अपघाताच होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, पाण्यात दगड रचून बांधलेल्या जोत्यावर भिंत बांधलेली आहे. भिंतीच्या कडेलाच वाहनांचे बेकायदा पार्किंग होते. तसेच खालून पाण्याचा दाब आणि वरून वाहनांचा भार, यामुळे भिंत कोसळली, अशी माहिती गौरीपाडा येथील रहिवासी वसंतअप्पा म्हात्रे यांनी दिली. यामुळे सदर भिंत ज्या ठेकेदाराने बांधली त्याच्यासह देखरेख ठेवणाºया अधिकाºयाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

एका नागरिकाने खबर दिल्याने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. भिंतीसह दोन झाडेही पाण्यात पडली. ती जेसीबीद्वारे खेचून वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोºया बांधल्या आहेत. केडीएमसीच्या अधिकाºयांना त्याची कल्पना दिली आहे.
- दिलीप गुंड, अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी

घटनास्थळी पाहणी केली आहे. निधी उपलब्ध होताच भिंतीची पुनर्बांधणी शक्य होईल. तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स उभारण्याचे काम सुरू केले आहे.
- शशांक केदार,
उपअभियंता, बांधकाम विभाग, केडीएमसी

Web Title: The guard wall of Gauripada lake collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड