आर्थिक संकटातून झाली कुटुंबाची मुक्तता, आर्थिक स्थैर्याचा मोकळा श्वास, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 03:37 AM2017-12-17T03:37:54+5:302017-12-17T03:38:03+5:30

शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले. फेडण्याचे प्रयत्न सुरू होते; पण अतिवृष्टीमुळे शेताची केलेली बांधबंदिस्तीही वाहून गेली. पिकाचे नुकसान झाले. सोसायटीचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी समस्या निर्माण झाली.

Freedom of family, financial stability, breathing through financial crisis, Chhatrapati Shivaji Maharaj Farmer's Honor Plan | आर्थिक संकटातून झाली कुटुंबाची मुक्तता, आर्थिक स्थैर्याचा मोकळा श्वास, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

आर्थिक संकटातून झाली कुटुंबाची मुक्तता, आर्थिक स्थैर्याचा मोकळा श्वास, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

Next

अलिबाग : शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले. फेडण्याचे प्रयत्न सुरू होते; पण अतिवृष्टीमुळे शेताची केलेली बांधबंदिस्तीही वाहून गेली. पिकाचे नुकसान झाले. सोसायटीचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी समस्या निर्माण झाली. कर्जाच्या बोजामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवल्याची परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळी शासन मदतीला धावून आले, कर्जमाफी झाली आणि शासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाची आर्थिक संकटातून मुक्तता झाली, असे सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी सांगितले. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे जिल्ह्यातील १० हजार ९४० शेतकºयांना १९ कोटी ६१ लाख ९ हजार ८४६ रु पयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यातील मधुकर पाटील हे एक. आज त्यांचे कुटुंब कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थैर्याचा मोकळा श्वास घेत आहे.
अलिबाग सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी त्यांच्या १ एकर शेतीमध्ये ओम-३ व जया ही भाताची बियाणी पेरली होती. शेताच्या बांधबंदिस्तीसाठी त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हाशिवरे शाखेतून सन २०१५-१६मध्ये दोन लाख ७० हजार रु पये इतके कर्ज घेतले होते; पण निसर्गाची अवकृपा झाली. अतिवृष्टीमुळे बांधबंदिस्ती वाहून गेली, त्यामुळे शेतामध्ये पेरलेली भाताची बियाणी कुजली, अपेक्षित उत्पादन बुडाले, त्यामुळे पाटील यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. भाताचे पीक वाया गेले. एकीकडे कर्जाचा बोजा आणि दुसरीकडे अपेक्षित उत्पादन न झाल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती खचली आणि सोबत मनोधैर्यही; परंतु जिद्दीने या स्थितीचा सामना सुरू होता. कर्जफेडीचे प्रयत्न सुरू होते.
नुकताच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत १ एप्रिल, २००९ ते ३० जून, २०१६ अखेर थकबाकीदार शेतकºयांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकºयांना एक वेळ समझोता योजना लागू केली. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले. यामध्ये शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला व तो शेतकºयांच्या कर्जखात्यात (कर्जमाफी) व बचत खात्यात (प्रोत्साहनपर) वर्ग करण्यात आला.

- मधुकर पाटील यांनी त्यांच्या दोन लाख ७० हजारांपैकी ४८ हजार रु पये कर्ज फेडणे बाकी होते. शासनाने हा कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने त्यांचे उर्वरित ४८ हजार रु पये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. शासनाने हा एक चांगला निर्णय घेतला.
या ऐतिहासिक निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना एक दिलासा मिळाला असून, आर्थिक संकटातून कुटुंबाला हातभार लागला आहे. आता हे कुटुंब नव्या उमेदीने आपल्या काळ्या आईची सेवा करण्यास सज्ज झाले आहे.

Web Title: Freedom of family, financial stability, breathing through financial crisis, Chhatrapati Shivaji Maharaj Farmer's Honor Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी