माथेरानमध्ये चार दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 06:17 AM2017-11-13T06:17:52+5:302017-11-13T06:19:16+5:30

माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Four shops were destroyed in Matheran | माथेरानमध्ये चार दुकाने भस्मसात

माथेरानमध्ये चार दुकाने भस्मसात

Next
ठळक मुद्देमुख्य बाजारपेठेत आग दुकानदारांचे ७0 ते ८0 लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून,  दुकानांना लागूनच असलेल्या घरातील रोकड, दागिने, टीव्ही, फ्रीज या सार ख्या किमती वस्तू या आगीत भस्मसात झाल्याने येथील दुकानदारांचे मोठय़ा  प्रमाणात नुकसान झाले आहे.
या वेळी हीना चिक्की मार्ट, निहाल एजन्सी, के.जी.एन. बेकरी, दिलावर बेकरी  या दुकानांची आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला; परंतु कर्जत व  खोपोली येथील अग्निबंब वाहन मोठे असल्याने घाटातून वर आणण्यास श क्य नसल्याने तसेच वेळेत पोहोचू शकत नसल्याने, माथेरान नगरपरिषदेच्या  अग्निबंब गाडीच्या साहाय्याने पाणीपुरवठा केंद्र येथून तीन ते चार फेर्‍या  पाण्याच्या, तसेच शेजारील केतकर हॉटेलमालक प्रमोद नायक व मिस्टी  रीसॉर्टचे अल्ताफ शेख यांनी आपल्याकडील संपूर्ण पाणी आग  विझविण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच स्थानिक तरु ण व काही  लोक प्रतिनिधींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य केले. या  वेळी आग विझविण्यासाठी स्थानिक तरु ण सीताराम कुंभार, भास्कर शिंदे,  किरण चौधरी, कुलदीप जाधव, नासीर शारवान, माजी नगरसेवक प्रकाश सु तार तसेच इतर रहिवाशांनी आगीवर नियंत्रण आणले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,  नगरसेविका वर्षा रॉड्रिक्स, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, गटनेते प्रसाद  सावंत यांनी धाव घेतली. या वेळी स्थानिक तरु णांनी आपल्या जीवाची परवा  न करता, आग आटोक्यात आणल्यामुळे या दुकानांना लागून असलेली दुसरी  दुकाने व घरे वाचली; परंतु या घटनेमुळे खान कुटुंबीय आपली राहते घर,  दुकाने जळल्यामुळे होत्याचे नव्हते झाल्याने माथेरान नगरपरिषद व  नागरिकांकडे व्यवसाय करण्यासाठी दुकाने व घरासाठी दया, याचना करत  सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
 या आगीचे अद्याप कारण समजले नसून स्थानिकांच्या मदतीने आगीवर  नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला असून, माथेरानमध्ये या आ पत्तीजनक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न प्रशासनाने, आपत्कालीन  कक्ष, ग्राम सुरक्षा दल, अग्निशमन दल कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे  स्थानिकांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Four shops were destroyed in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग