जेएनपीटी बीएमसीटी बंदरात पहिल्यांदाच महिला आॅपरेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 07:02 AM2018-03-09T07:02:18+5:302018-03-09T07:02:18+5:30

जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरात (बीएससीटी) उपकरण आॅपरेटर म्हणून १३ महिला काम करीत आहेत.

 For the first time female operators in JNPT BMCT port | जेएनपीटी बीएमसीटी बंदरात पहिल्यांदाच महिला आॅपरेटर

जेएनपीटी बीएमसीटी बंदरात पहिल्यांदाच महिला आॅपरेटर

उरण - जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरात (बीएससीटी) उपकरण आॅपरेटर म्हणून १३ महिला काम करीत आहेत. आंतरराष्टÑीय मानांकनानुसार उपकरण आॅपरेटर म्हणून करीत असलेले बीएमसीटी हे देशातील पहिले बंदर ठरले आहे.
जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात काम करणाºया महिलांमध्ये व्यावसायिक, अभियांत्रिकी, वित्त, मनुष्यबळ, माहिती तंत्रज्ञान, परिचालन आदि विभागामध्ये या १३ महिला कार्यरत आहेत. कंपनीने उद्योगामध्ये महिलांना प्राधान्य देवून पारंपरिक पुरुषी काम समजल्या जाणाºया विचाराला छेद देण्याचे काम केल्याबद्दल महिला आंतरराष्टÑीय शिपिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग असोसिएशनच्या अध्यक्षा संजाम शाही यांनी कौतुक केले आहे. तर बीएमसीटीचे सीईओ सुरेश अमिरपू यांनी महिला कर्मचाºयांना यशस्वी होताना पाहून आनंद होत असल्याचे सांगितले. महिला कर्मचाºयांनीच आमच्या सुरक्षित आणि उत्पादनशील वातावरणाला सहाय्य केले आहे. कंटेनर क्षेत्रात काम करणाºया महिलांनी अत्यंत कमी वेळात आवश्यक ज्ञान आत्मसात केले आहे. याआधी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाºया या कंटेनर क्षेत्रात महिलांनीही समाधानकारक काम करणाºया बीएमसीटीच्या महिलांना आंतरराष्टÑीय महिला दिनाच्या शुभेच्छाही सुरेश अमीरपू यांनी दिल्या आहेत.
बीएमसीटीमध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या सारिका कोळी, वैशाली तांडेल, प्रतीक्षा म्हात्रे, भावना भोईर, प्रियांका ठाकूर, दर्शना पाटील, ऐश्वर्या कडू, त्रिशा ठाकूर आदि महिलांनी बंदर आणि कंटेनर हाताळणी क्षेत्रातील नोकरीचा अनुभव कथन करताना आनंद व्यक्त केला आहे.
 

महिला कर्मचाºयांनीच आमच्या सुरक्षित आणि उत्पादनशील वातावरणाला सहाय्य केले आहे.
कंटेनर क्षेत्रात काम करणाºया महिलांनी अत्यंत कमी वेळात आवश्यक ज्ञान आत्मसात केले आहे.
पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाºया या कंटेनर क्षेत्रात महिलांनीही समाधानकारक काम करणाºया बीएमसीटीच्या महिलांना आंतरराष्टÑीय महिला दिनाच्या शुभेच्छाही सुरेश अमीरपू यांनी दिल्या आहेत.

Web Title:  For the first time female operators in JNPT BMCT port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.