अलिबागमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 10:27 AM2019-04-01T10:27:28+5:302019-04-01T10:28:10+5:30

कुरुळ गावातील रसाणी डोंगर परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास बंदुकीतून झालेल्या गोळीबारात कुरुळ गावातील सागर दत्तात्रेय पाटील हा तरुण ठार झाला आहे

Firing in Alibaug, one killed and 1 injured | अलिबागमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी 

अलिबागमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी 

Next

जयंत धुळप 

अलिबाग - कुरुळ गावातील रसाणी डोंगर परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास बंदुकीतून झालेल्या गोळीबारात कुरुळ गावातील सागर दत्तात्रेय पाटील हा तरुण ठार झाला आहे तर गौरव चंद्रकात भगत हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रिवॉल्व्हरमधून गोळीबार करणारा निलेश वाघमारे या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मृत सागर पाटील आणि जखमी गौरव भगत हे आपल्या मित्रांसोबत रसाणी डोंगर परिसरात पार्टी करण्यासाठी गेले होते. तेथून बाईकवरुन परतताना हा गोळीबारीचा प्रकार घडला. गोळीबार करण्यामागे नेमका काय कारणं होती याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Firing in Alibaug, one killed and 1 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.