आगामी निवडणुकीत जातीयवादाविरोधात लढा - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:27 AM2018-12-18T05:27:36+5:302018-12-18T05:27:54+5:30

जयंत पाटील : शेकाप मध्यवर्ती समितीची बैठक; कार्यकर्त्यांना आवाहन

The fight against communalism in the coming election - Jayant Patil | आगामी निवडणुकीत जातीयवादाविरोधात लढा - जयंत पाटील

आगामी निवडणुकीत जातीयवादाविरोधात लढा - जयंत पाटील

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी

अलिबाग : देशात आणि राज्यात सध्या ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, ते सर्वसामान्य, गोरगरीब व बहुजनांसाठी घातक आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न जातीयवादी शक्ती करीत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन जातीयवादाविरोधात लढायचे आहे. त्यामध्ये शेकापची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
अलिबागमधील चेंढरे येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शनिवार व रविवारी अशी दोन दिवस शेकाप मध्यवर्ती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, पुणे जिल्हा चिटणीस राहुल पोकळे, रायगड जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे आदी मान्यवर तसेच राज्याचे पदाधिकारी, सदस्य व राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकारी मोेठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे देशात शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे, अशी मागणी सर्वात आधी शेकापने केली आहे. सध्याचे प्रतिगामी सरकार तेच धोरण राबवून किफायतशीर हमीभाव देण्याचा निर्णय घेत आहे. राज्यात यंदा ७८ टक्के पाऊस पडल्याने दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील दुष्काळाबाबत शेतकरी कामगार पक्ष एक वेगळ्या भूमिकेतून काम करणार आहे. पाणी दुष्काळ, रोजगार हमीबाबत रखडलेली कामे याबाबत प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. त्यापद्धतीने कार्यकर्त्यांनी काम करायचे असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

खते मोफत द्या ही शेकापची मागणी
च्पाऊस असमाधानकारक पडल्याने खरीप हंगामात भात कापता आले नाही. रब्बी हंगामात लागवड करता आली नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यातील शेतकºयांना न्याय देण्यासाठी शेकापने आक्र मक होऊन काम करण्याची गरज आहे. शासनाने यंदा शेतकºयांसाठी बियाणांबरोबरच खते मोफत दिली पाहिजे. पक्षाच्यावतीने दबाव आणून राज्यात एक वेगळे वातावरण निर्माण करायचे आहे. शेतकरी कामगार पक्षाचे विचार तरु णांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. विविध संघटना, संस्थांनी एकत्र येऊन प्रभावी काम करायचे आहे. महिला, युवक, विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारी संघटना निर्माण करून शेकापचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे आहे, असे पाटील म्हणाले.

मध्यवर्ती समिती पदाधिकारी, सदस्यांची निवड जाहीर
च्शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समिती बैठकीच्या समारोपाच्यावेळी मध्यवर्ती समिती पदाधिकारी व सदस्यांची निवड आ. धैर्यशील पाटील यांनी जाहीर केली. त्यामध्ये शेकाप सरचिटणीसपदी आ. जयंत पाटील, सहचिटणीसपदी प्रवीण गायकवाड, कोषाध्यक्षपदी राहुल पोकळे, कार्यालयीन चिटणीसपदी अ‍ॅड. राजेंद्र कोरडे तसेच सदस्यपदी शेकापचे ज्येष्ठ नेते विवेक पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, सुरेश खैरे, जे. एम. म्हात्रे, हरचंद सिंह, मनोज कुट्टी, डी. एन. यादव,अरिफ दाखवे यांची निवड करण्यात आली असून अन्य जिल्ह्यातील शेकाप पदाधिकाºयांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
 

Web Title: The fight against communalism in the coming election - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.