The farmer's suicides in Baran village | बारणे गावातील शेतक-याची आत्महत्या

कर्जत : तालुक्यातील बारणे गावातील एका तरु ण शेतक-याने शेतीमधील नुकसानीबद्दल विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मालकीची जमीन नसलेल्या त्या शेतक-याने दुस-याची शेती भाड्याने घेऊन शेती केली होती. मात्र, अवेळी पावसाने त्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर त्या शेतकºयाच्या डोक्यावर होता.
बारणे गावातील शेतकरी चंद्रकांत गणू ठोंबरे हे दिवसा मोलमजुरी आणि रात्री सुरक्षा रक्षकाचे काम करायचे. ३८ वर्षीय ठोंबरे यांच्या कुटुंबाकडे जमीन नसल्याने त्यांनी शेतीतून खायचे तांदूळ पिकविण्याचा निर्णय घेतला आणि गावातील एका शेतकºयाची दोन एकर जमीन भाड्याने घेऊन भाताची शेती करण्याचा निर्णय घेतला. जून २०१७ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने भाताची शेती केली. शेती करण्यासाठी जमीन भाड्याने घेताना बियाणे, खते हे कर्ज काढून आणले होते. त्या वेळी जमिनीतून भाताचे उत्पादन झाल्यानंतर लोकांकडून घेतलेले कर्ज फेडू, असा विश्वास चंद्रकांत ठोंबरे यांना होता. रात्री कर्जत तालुक्यातील कुशिवली येथे असलेल्या कॉलेजमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारे चंद्रकांत हे दिवसा शेतात काम करायचे. दिवाळी सणाच्या दरम्यान सर्वत्र अवेळी पाऊस झाला होता. वादळी वाºयासह सतत आठवडाभर आलेल्या पावसामुळे चंद्रकांत ठोंबरे यांनी लावलेल्या शेतात उभे असलेले भाताचे पीक कोसळले होते. त्या भागातील जमीन पाण्याची असल्याने शेतात साचून राहिलेले पाणी अनेक दिवस तसेच राहिले आणि भाड्याने जमीन घेऊन केलेल्या भाताच्या शेतातील पीक हे शेतातच कुजून गेल्याने ठोंबरे कुटुंबाचे नुकसान होऊन चंद्रकांत ठोंबरे हे कर्जाच्या फेºयात अडकले. याच तणावात १ डिसेंबर रोजी सकाळी घरातून काहीही न सांगता घराबाहेर पडलेला चंद्रकांत दुपार झाली तरी घरी आला नाही, म्हणून वडील,पत्नी, मुलगा आणि भाऊ हे शोध सुरू के ला असता शेतात विषारी औषध प्राशन के ल्याचेलक्षात आले.
ग्रामस्थांच्या मदतीने या शेतकºयाला कर्जत येथे दवाखान्यात नेले. मात्र, दुपारी अडीच वाजता या शेतकºयाचा मृत्यू झाल्याचे डॉ. साबणे यांनी जाहीर केले. अशा प्रकारे शेतीत झालेले नुकसान यामुळे बारणे गावातील तरु ण शेतकºयाला आत्महत्या करण्याची वेळ आली.