महामार्गालगत जागा वापरास अतिरिक्त पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:32 AM2018-07-20T01:32:26+5:302018-07-20T01:33:20+5:30

महामार्ग विभागाने परवानगी न घेता वापर करणा-या व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत.

Extra money for using highway space | महामार्गालगत जागा वापरास अतिरिक्त पैसे

महामार्गालगत जागा वापरास अतिरिक्त पैसे

Next

सिकंदर अनवारे

दासगाव : महामार्गालगत असणाऱ्या ज्या व्यवसायिकांनी इमारत बांधकाम करताना आणि व्यवसाय करताना महामार्ग विभागाची परवानगी न घेता जोडरस्ता तयार केला आहे, अशा सर्व व्यवसायिकांना आता पैसे मोजावे लागणार आहेत. महामार्ग विभागाने परवानगी न घेता वापर करणा-या व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत.
महामार्गावरून आपला व्यवसाय असलेल्या ठिकाणी रस्ता करताना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, अनेकांनी या परवानग्या घेतलेल्या नाहीत. महामार्ग विभाग कित्येक वर्षांनी जागे झाले असून, आता या व्यावसायिकांना नोटिसा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामध्ये गॅरेज, हॉटेल व्यावसायिक, मोटार भाग विक्रेत्यांचा समावेश आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर विविध ठिकाणी महामार्गालगत अनेकांनी व्यावसायिक इमारती, निवासी संकुल, व्यावसायिक गाळे उभे केले आहेत. अशा व्यावसायिकांनी महामार्ग बांधकाम विभागाची परवानगी घेतलेली नाही. महामार्गालगत कोणतेही बांधकाम करत असताना नियोजित अंतर सोडून बांधकाम करावयाचे आहे. शिवाय याकरिता महामार्गाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते.
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील दासगाव ते महाडपर्यंत असलेली विविध बांधकामे ही व्यावसायिक कारणास्तव झाली आहेत. या बांधकामांना महामार्गावरून जोडरस्ता असणे आवश्यक आहे. ही परवानगी अनेकांनी न घेतल्याने महामार्ग विभागाने महाडजवळील व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये हॉटेल व्यावसायिक, गॅरेज, व्यावसायिक गाळेधारक आदींचा समावेश आहे. आतापर्यंत महामार्ग विभागाने महाडनजीक असलेल्या ३० व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. उर्वरित व्यवसायिकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. ज्या निवासी संकुलांच्या जवळ व्यावसायिक गाळे आहेत, अशा निवासी संकुलांना देखील नोटीस बजावल्या, अशी माहिती महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी दिली. ज्यांना या नोटिसा बजावल्या आहेत त्यांनी महामार्ग विभागाकडे रीतसर अर्ज करून परवानगी घ्यावयाची आहे.
अनेक वर्षांपासून हे व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. महामार्गालगत अनेकांनी आपले गाळे, व्यावसायिक बांधकामे केली आहेत. याकरिता महामार्ग विभागाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. मात्र, त्या त्या वेळेला कोणतीच कारवाई न झाल्याने बांधकामामध्ये वाढ झाली आहे. शिवाय महामार्ग विभागाकडे मनुष्यबळ देखील नसल्याने या कारवाईत अडथळा निर्माण झाल्याचे कारण महामार्ग विभाग पुढे करीत आहे. प्रत्यक्षात मात्र येथील अधिकाºयांनीच दुर्लक्ष केल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

पदपथ तोडून व्यावसायिकांनी केले मार्ग
च्यावर महामार्ग विभाग केवळ नोटिसा बजावणार हे दिसून येत आहे. महाडजवळ महामार्गावर विसावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ते बुटाला सभागृहापर्यंत महामार्गालगत पदपथ तयार करण्यात आला होता.
च्मात्र, या पदपथावर देखील बेमालूमपणे व्यवसाय उभे राहिले आहेत. महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पदपथ तोडून व्यावसायिकांनी मार्ग तयार केले आहेत. काही ठिकाणी प्रवासीवाहतूक करणारी वाहनेदेखील उभी राहतात, यामुळे पादचारी आणि विद्यार्थ्यांना चालणे अवघड होऊन बसते.

Web Title: Extra money for using highway space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.