Error in stalling HSC Hall, students angry | बारावीच्या हॉल तिकिटात त्रुटी, विद्यार्थी संतप्त
बारावीच्या हॉल तिकिटात त्रुटी, विद्यार्थी संतप्त

- प्राची सोनवणे
नवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कनिष्ठ महाविद्यालयांनी यातून अंग काढून घेतल्याने ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात खेटा माराव्या लागत असल्याने हतबल झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वास्तविक हॉल तिकिटांमधील चुका महाविद्यालयांनीच सुधारणे आवश्यक असताना, महाविद्यालये विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासाऐवजी हॉल तिकीट दुरुस्तीच्याच कामात जात असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आयसीएल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला असून, महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बोर्डाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार हॉल तिकिटावरील दुरुस्तींविषयी प्री लिस्ट कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात आली होती, तरीसुद्धा त्यामध्ये बदल न केल्याने चुका आढळून येत आहेत. शाळा, महाविद्यालयाकडून झालेल्या चुकांमधील दुरुस्तीकरिता संबंधित शाळा-महाविद्यालयांच्या वतीने दुरुस्ती संदर्भात बोर्डाला अर्ज सादर करणे आवश्यक असून, त्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटाची झेरॉक्स सोबत जोडून दुरुस्तीच्या ठिकाणी मुख्याध्यापकांची सही व शिक्का असणे, आवश्यक असल्याची माहिती बोर्डाने दिली.
पालकांनी याविषयी महाविद्यायाच्या निष्काळजीपणावर टीका केली असून, विद्यार्थ्यांनी अभ्यास कधी करायचा? बारावी हा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असून, यामध्ये कोणतीही रिस्क घेण्यास विद्यार्थी तयार नसतात. अशा वेळी हॉल तिकिटावरील दुरुस्तीकरिता मात्र विद्यार्थ्यांना तासन्तास उभे राहावे लागत असून, महत्त्वाचा वेळ वाया जात असल्याची प्रतिक्रिया पालक रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली. ऐनवेळी हॉल तिकिटातच त्रुटी आढळल्याने विद्यार्थ्यांना गोंधळ उडाला आहे. फोटो, नाव, विषय, लिंग, माध्यम यामध्ये साम्यता नसल्याने अभ्यासाची तयारी सोडून त्रुटी निस्तारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. या प्रकरणी कॉलेज विभागीय मंडळाला, तर विभागीय मंडळ विद्यार्थी व कॉलेजला दोषी ठरवत असल्याचे चित्र दिसून येते.

महाविद्यालयांकडून लूट
हॉल तिकिटावरील बदलांकरिता विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. महाविद्यालयांची चूक असल्याने १०० रुपये शुल्क जमा करण्याची जबाबदारी सर्वस्वी महाविद्यालयांवर असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थी, तसेच पालकांची लूट केली जात असून एका बदलासाठी ३०० रुपये दर आकारले जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आमची चूक नसतानाही आम्ही अतिरिक्त शुल्क का भरावे? असा संताप अपर्णा मोरे या विद्यार्थिनीने व्यक्त केला आहे. हॉल तिकिटावरील दुरुस्तीकरिता महाविद्यालयात अर्ज करण्यासाठी भली मोठी रांग आहे आणि यात पूर्ण दिवस वाया जात असून, गेले दोन दिवस मी कॉलेजला खेटा मारत असल्याचेही अपर्णाने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी स्वत:च आॅनलाइन पद्धतीने फॉर्म भरले असून, यामध्ये मंडळाची काही चूक नाही. महाविद्यालयांनी कव्हरिंग लेटरसह अर्ज आणि हॉल तिकिटाची झेरॉक्स सोबत जोडून मंडळाला सादर करणे आवश्यक आहे. नवीन हॉल तिकीट विद्यार्थ्यांना दिले जाणार नाही. मात्र, मंडळाकडे दुरुस्तीची नोंद केली जाईल. महाविद्यालयांना पूर्व यादी पाठविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बदल न केल्याने हा गोंधळ उडाला आहे. याकरिता महाविद्यालयाने १०० रुपये अतिरिक्त शुल्क जमा करणे आवश्यक आहे.
- डॉ. सुभाष बोरसे,
सचिव, शिक्षण मंडळ, मुंबई


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

रायगड अधिक बातम्या

उन्हेरे धरणाला लागली गळती, पाणी साठवण क्षमता झाली कमी

उन्हेरे धरणाला लागली गळती, पाणी साठवण क्षमता झाली कमी

12 hours ago

प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा

प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा

1 day ago

खडी उखडल्याने अपघातामध्ये वाढ

खडी उखडल्याने अपघातामध्ये वाढ

1 day ago

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी

1 day ago

घोटाळ्यात अडकलेल्यांना कामे दिसत नाहीत- अनंत गीते

घोटाळ्यात अडकलेल्यांना कामे दिसत नाहीत- अनंत गीते

2 days ago

मुंबई विद्यापीठात पालीतील प्रकल्पाची बाजी

मुंबई विद्यापीठात पालीतील प्रकल्पाची बाजी

2 days ago