कोकण विधान परिषदेची आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:43 AM2018-05-21T01:43:11+5:302018-05-21T01:43:11+5:30

रायगड जिल्ह्यातील २३१ स्त्री आणि २३८ पुरुष असे एकूण ४६९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Election of Konkan Legislative Council today | कोकण विधान परिषदेची आज निवडणूक

कोकण विधान परिषदेची आज निवडणूक

Next

अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेची निवडणूक २१ मे रोजी पार पडत आहे. शिवसेनेचे अ‍ॅड. राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. रायगड जिल्ह्यातील २३१ स्त्री आणि २३८ पुरुष असे एकूण ४६९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग रोहे, श्रीवर्धन, माणगाव आणि महाड येथील प्रांताधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या कालावधीत मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शेकाप, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तटकरे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

Web Title: Election of Konkan Legislative Council today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.