बळीवरे पुलाला रेती उत्खननामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 04:28 AM2019-02-21T04:28:58+5:302019-02-21T04:29:28+5:30

महसूल विभागाचे दुर्लक्ष : पुलाखाडी पडले मोठे खड्डे

 Due to the quarrying of the cattle feed, the danger is due to quarrying | बळीवरे पुलाला रेती उत्खननामुळे धोका

बळीवरे पुलाला रेती उत्खननामुळे धोका

Next

नेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील बळीवरे नदीजवळ असलेल्या पुलाखाली रेती उत्खनन सुरू असून या रेती उत्खननामुळे येथील पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेती उत्खनन करून पुलाखाली मोठमोठे खड्डे केले आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांचे फावले आहे.

कर्जत तालुक्यात नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन तसेच दगड फोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नदी पात्रातून दिवसा व मध्यरात्री वाळू चोरीचा प्रकार सर्रास घडत आहे. महसूल विभागाकडून या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गौणखनिज महसूल थेट वाळू माफियांच्या खिशात जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. अनेक महिन्यांपासून अवैध वाळू चोरीविरु द्ध कारवाई थंडावल्याने वाळू माफियांची मजल वाढली आहे, रेती उपशामुळे अनेक नदी, ओढे पात्र कोरडे पडले आहेत. या प्रकारामुळे अनेक पुलांंना धोका निर्माण झाला आहे.

कर्जत, कशेळे, नेरळ, कळंब खांडस, पोशीर या सर्व भागात रात्री- अपरात्री नदीपात्रातून वाळू चोरीचा प्रकार सुरू आहे. अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर अंकुश बसावा म्हणून प्रशासनाने दंड लागू केला आहे, काही महिन्यांपूर्वी डिकसळ भागात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली आहे. त्यामुळे वाळू माफिया पुन्हा सक्रि य झाले आहेत. या उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे नियम धाब्यावर बसवून वाळू चोरीचा प्रकार सर्रास घडू लागला आहे. शिवाय शासनाचा महसूलही बुडविला जात आहे.
सध्या कर्जतसह सर्वत्र बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती चोरी करण्यात येत आहे. महसूल विभागाकडून चोरी करणाºया वाहनांविरु द्ध कडक कारवाई होत नाही. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

बळीवरे पुलाखाली रात्री रेती उत्खनन केले जाते, येथे पाहणी केली आहे. परंतु दिवसा रेती काढताना आढळून आल्यास त्वरित कारवाई केली जाईल.
- एस. डी. पादिर,
तलाठी, नांदगाव

Web Title:  Due to the quarrying of the cattle feed, the danger is due to quarrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.