अतिवृष्टीमुळे म्हसळेत दोन लाख ७२ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:17 AM2019-07-04T04:17:22+5:302019-07-04T04:17:43+5:30

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद केले आहे. तालुक्यात आतापर्यंत ११७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Due to excessive rainfall, loss of two lakh 72 thousand rupees | अतिवृष्टीमुळे म्हसळेत दोन लाख ७२ हजारांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे म्हसळेत दोन लाख ७२ हजारांचे नुकसान

Next

म्हसळा : म्हसळा तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आह. याचा फटका नागरिकांना व शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीतील कामे संथ गतीने होत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद केले आहे. तालुक्यात आतापर्यंत ११७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने घरांत पाणी घुसले आहे. नवे नगर, दिघी मार्ग परिसरांत गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी घुसत होते. या कालावधीत घरांचे छप्पर, वासे, कौले व कोने पडणे, पत्र्यांचे नुकसान होणे या नैसर्गिक आपत्तीन तालुक्यात एकूण २ लाख ७१ हजार ९०० रुपयांची नुकसान नोंद झाली आहे.
तालुक्यातील पाभरे, कांदळवाडा, घुम, केलटे येथे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले आहे. वादळी वाºयात विजेचा खांब पडून खरसई येथे गाय,काळसुरी येथे बैल, म्हसळा येथे म्हैस मृत होऊन शेतकºयांचे १ लाख २७ हजारांचे नुकसान झाले आहे. तर घोणसे येथे फरशी, कुंबळे येथे स्लॅबचे बांधकाम कोसळून सुमारे ३ लाख ४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यांंनी दिली.
पुणे- दिघी राष्ट्रीय महामार्गावर एमएमआरडीचे अधिकाºयांचे दुर्लक्ष व ठेकेदाराचे निकृष्ट कामामुळे शेतकºयांना आपल्या शेतात जाण्यासाठी सुलभ रस्ता नसल्याने अडचणी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत अद्याप उपाययोजना झालेल्या नाहीत.

बीएसएनएल ठप्प
तालुक्यात बीएसएनएलची सेवा ठप्प झाली होती. नेटवर्क सेवाही बंद झाल्याने अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये, बँकामध्ये व्यवहार बंद होते. तालुक्यात अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तालुका तहसीलदार शरद गोसावी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत..

विजेचा लपंडाव सुरूच!
एकीकडे जोरदार पाऊस पडत असतानाच म्हसळा शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव अधूनमधून सुरूच होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
काही गावांतून तब्बल ३ ते ४ दिवस वीजपुरवठा नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Due to excessive rainfall, loss of two lakh 72 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस