रखडलेल्या कामांमुळे प्रवासी त्रस्त, खराब रस्त्यामुळे नाहक टोलचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:22 AM2017-11-02T05:22:05+5:302017-11-02T05:22:16+5:30

सात वर्षे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम रखडल्यानंतर राष्टÑीय महामार्ग विभागाचे इंदापूर ते पोलादपूर अशी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रारंभ केला आहे.

Due to abandoned work, strayed toll due to passenger stricken, poor road | रखडलेल्या कामांमुळे प्रवासी त्रस्त, खराब रस्त्यामुळे नाहक टोलचा भुर्दंड

रखडलेल्या कामांमुळे प्रवासी त्रस्त, खराब रस्त्यामुळे नाहक टोलचा भुर्दंड

Next

- सिकंदर अनवारे

दासगाव : सात वर्षे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम रखडल्यानंतर राष्टÑीय महामार्ग विभागाचे इंदापूर ते पोलादपूर अशी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यातील काम रखडल्यामुळे कोकणवासीयांना टोल भरून पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करावा लागत आहे. जर पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसºया टप्प्यातील चौपदरीकरण रखडले तर कोकणवासीयांना वाली कोण? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात
आहे.
देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या रुपेरी दुनियेने जगाला मोह घालणाºया मुंबईला गोव्याशी जोडणारा हा महामार्ग आहे. देशातील अनेक जुने महामार्ग झाले तर महामार्ग चौपदरीकरण आणि सहा पदरी झाले, मात्र मुंबई-गोवा महामार्ग आजही अरुंद स्थितीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासीय या महामार्गाच्या रुंदीकरणाची आणि चौपदरीकरणाची मागणी करीत आहे. मात्र या मागणीकडे सर्वपक्षीय राजकारण्यांचे दुर्लक्ष झाले आहे. अनेक अपघात आणि निष्पाप प्रवाशांचे जीव घेतल्यानंतर सात वर्षांपूर्वी रस्त्याच्या चौपदरीकरणाला प्रारंभ झाला. दोन वर्षात पूर्ण होणारे हे काम गेल्या सात वर्षांपासून आजही अपूर्ण अवस्थेत आहे.
अनेक ठिकाणी भराव, उड्डाणपूल, नदीवरील मुख्य पूल आदी कामे पहिल्या टप्प्यातच चालू आहेत, तर पूर्ण झालेला रस्ता पक्क्या स्वरूपाचे डांबरीकरण नसल्याने ठिकठिकाणी खचत आहे. पहिल्या टप्प्यातील या रस्त्यावर सर्वत्र अपघातजन्यस्थिती निर्माण झाली आहे. खराब रस्त्यावरील खड्डे चुकविताना आजही अनेक अपघात होत आहेत.
सात वर्षे पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम रखडल्यानंतर सुरू करण्यात आलेला चौपदरीकरणाचा इंदापूर ते पोलादपूर हा दुसरा टप्पा कोकणवासीय प्रवासी आणि वाहन चालकांच्या मनात साशंकता निर्माण करत आहे.
चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्यातील काम पनवेल ते इंदापूर असे आहे. यामुळे मुंबईकडे जाणाºया कोकणवासीयांना वाकण (पाटलीपाडा) खोपोलीमार्गे मुंबई द्रुतगती मार्ग या मार्गाने सोईचा आहे. यामुळे इंदापूरनंतर येणाºया सुकेळी खिंड, वडखळ, पेण आणि कर्नाळा पळस्पे दरम्यान रखडलेल्या चौपदरीकरणाचा रस्त्यावरील खड्ड्यांचा आणि त्यामुळे होणाºया वाहतूककोंडीचा त्रास कमी करत मुंबईकडे जाण्या-येण्याचा सहज रस्ता बनला आहे. खड्डे आणि वाहतूककोंडी चुकविण्यासाठी १३८ (एकशे अडतीस) रुपयांचा टोल भरून कोकणवासीय आर्थिक भुर्दंड सहन करत
आहेत.
पहिल्या टप्प्याप्रमाणे इंदापूर ते पोलादपूर हा सुमारे ८० किमीचा दुसºया टप्प्यातील रस्ता चौपदरीकरणाचे काम रखडले तर मुंबईकडे जाणाºया-येणाºया कोकणवासीयांचे काय होणार हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.

नवीन रस्त्यावर टिकाऊ काम झाले नाही
पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा भराव अगर पुलाच्या उभारणीच्या ठिकाणी लगत असलेला जुना रस्ता नवीन असलेल्या कामामुळे बाधित झाला. अशा रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले. लागलीच हे काम पूर्ण करणे गरजेचे होते. नवीन रस्त्याच्या कामाला वापरण्यात येणाºया यंत्रसामग्रीचा काही उपयोग राहिलेला नाही.
कामास प्रारंभ झाल्यानंतर डोंगरातून वाहणाºया पाण्यासाठी वाट करणे गरजेचे होते. मात्र हे न केल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर आले यामुळे रस्ते खराब झाले. नवीन रस्त्यावर टिकाऊ आणि मजबूत डांबरीकरण न झाल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. मात्र दुसºया टप्प्यातील कामात या चुका लक्षात घेणे गरजेचे आहे. जर पुन्हा याच चुका दुसºया टप्प्यात झाल्यातर जी परिस्थिती पहिल्या टप्प्याची आहे तीच पुन्हा इथे होईल. मग तर कोकणवासीयांचा प्रवास या मार्गी मोठ्या संक टाचा होईल.

गेली सात वर्षे पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. कामात होणारा हलगर्जीपणा आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे हे काम रखडले आहे. याचा फटका मात्र कोकणवासीयांना अपघाताच्या रुपात बसत असून या टप्प्यात या कामामुळे अनेक अपघात होवून अनेक लोक मृत्युमुखी तसेच जायबंदी झाले आहेत. दुसºया टप्प्याचा इंदापूर ते पोलादपूर हा रस्ता चांगला आहे. मात्र काम सुरू झाल्यानंतर याची देखील दुरवस्था पहिल्या टप्प्याच्या रस्त्यासारखी होणार आहे. तरी जोपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाला हात लावू नये. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांना पाली खोपोली मार्गे मुंबईकडे नाहक टोल भरून ये- जा करावी लागते. तो टोलही माफ करावा.
- माणिक जगताप, सरचिटणीस,
महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस

शासनाचा परिवहन विभाग प्रत्येक गाडीमागे रोड टॅक्स घेत रस्त्याची सुविधा देत असताना टोल देखील आकारला जातो. आज सरकारी अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी वगळता सर्वच नागरिक रस्त्यावरील हा टोल अदा करीत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लोकार्पण झाल्यानंतर या रस्त्यावर देखील टोल बसवला जाणार आहे. चांगल्या झालेल्या नवीन रस्त्यावर टोल वसुली केली जाणार असेल तर गेली सात वर्षे खड्ड्यांनी भरलेल्या आणि अपघातजन्य परिस्थिती असणाºया शारीरिक नुकसान आणि वाहनांची दुरुस्ती यावरील
खर्च शासन देणार आहे का याचा विचार करून विनाविलंब
पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे.
- इक्बाल अब्बास चांदले, उद्योगपती महाड

Web Title: Due to abandoned work, strayed toll due to passenger stricken, poor road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड