माजी नगरसेविकेला मोबाइलवरून तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:56 AM2019-07-15T05:56:01+5:302019-07-15T05:56:15+5:30

मुरुडच्या माजी नगरसेविका नादिया ढाकम यांना त्यांच्या पतीने मोबाइलवरून तलाक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Divorce on the former corporator's mobile | माजी नगरसेविकेला मोबाइलवरून तलाक

माजी नगरसेविकेला मोबाइलवरून तलाक

Next

आगरदांडा : मुरुडच्या माजी नगरसेविका नादिया ढाकम यांना त्यांच्या पतीने मोबाइलवरून तलाक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांचे पती ताबिश इब्राहिम ढाकम यांच्या विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यात प्रथमच असा प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
नादिया (३८, रा. दत्तवाडी) यांचे पहिले लग्न २००३ मध्ये अशफाक जैनु अबिदीन इद्रुस यांच्याशी झाले होते. ११ वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर ताबिश इब्राहिम ढाकम यांच्याबरोबर ७ जानेवारी २०१९ रोजी नेरळ येथील मस्जिदीमध्ये त्यांनी मुस्लीम धर्मानुसार दुसरे लग्न केले. ताबिश यांनी आपले पहिले लग्न झाल्याचे न सांगता नादिया यांच्याबरोबर दुसरे लग्न केल्याचे समजल्यानंतर नादिया यांनी त्याच्याकडे विचारणा केली.
त्यावेळी नादिया यांना मुरुड येथे दुसरी सदनिका घेऊन देणार, तसेच आठवड्यातील तीन दिवस नादिया आणि तीन दिवस पहिल्या पत्नीकडे राहणार असल्याचे ताबिश याने घरच्यांसमोर कबूल केले होते. मात्र, लग्नानंतर १५ दिवस उलटल्यानंतरही त्याने नवीन सदनिका खरेदी केली नाही. त्यानंतर अनेक वेळा पती ताबिश याला सदनिकेबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करीत असे. त्यामुळे नादिया पहिल्या पतीच्या घरी राहत होत्या.
दरम्यान, ताबिशपासून नादिया यांना दिवस गेले होते. याबाबत त्याला सांगितल्यावर ‘मला आता मूल नको’, असे सांगून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने गर्भपाताची गोळी खाण्यास दिल्याने नादिया यांची प्रकृती बिघडली. नादिया डॉक्टरकडे गेल्या असता चुकीच्या गोळ्यांमुळे त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर पती ताबिश इब्राहिम ढाकम यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांना घरी येऊन शिवीगाळी व दमदाटी केली. त्यानंतर वारंवार फोनवर संपर्क केला असता शिवीगाळी करून तलाकच्या धमक्या दिल्या. शेवटी १ जुलै रोजी नादिया ताबिश याच्या घरी राहण्यास गेल्या असता, त्याने मारहाण करून त्यांना घराबाहेर काढले. तसेच फोन करून तलाक दिल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नादिया यांनी पोलिसांत तक्रार दिली. यात पतीने आपणांस शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Divorce on the former corporator's mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.