पशुधनाच्या चाऱ्यासाठी जिल्हा सज्ज; खासगी उद्योगांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:04 AM2018-11-18T00:04:41+5:302018-11-18T00:13:52+5:30

पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पशुधनाबाबत उपाययोजना करावी, असे निर्देश देण्यात आले होते.

District ready for feeding fodder; Appeal to private industries | पशुधनाच्या चाऱ्यासाठी जिल्हा सज्ज; खासगी उद्योगांना आवाहन

पशुधनाच्या चाऱ्यासाठी जिल्हा सज्ज; खासगी उद्योगांना आवाहन

Next

- जयंत धुळप

अलिबाग : राज्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने पशुधनासाठी वैरण, चाºयाची संभाव्य टंचाईची शक्यता आहे.
उपाय म्हणून जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी कंपन्यांचे आवार, वनक्षेत्र, ग्रामपंचायती यांच्या हद्दीत, मोकळ्या जागी उगवलेले व जनावरांना चारा म्हणून उपयोगात येऊ शकेल असे गवत येत्या १५ दिवसांमध्ये कापून त्याचे गठ्ठे सुरक्षित जागी गंजी करून ठेवाव्या, जेणेकरून हे गवत वणव्यात भक्षस्थानी न पडता त्याचा उपयोग राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पशुधनांसाठी चारा म्हणून उपयोग करता येईल, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. जिल्हाधिकाºयांच्या या आवाहनास जिल्हाभरातून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पशुधनाबाबत उपाययोजना करावी, असे निर्देश देण्यात आले होते. त्याची तत्काळ अंमलबजावणी करीत जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील विविध विभाग, संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक संस्था यांना हे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी मोकळ्या जागेत गुरांना चारा म्हणून खाण्यायोग्य गवत-झाडेझुडपे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र नैसर्गिक वणव्याने ते अनेकदा जळून खाक होते. डिसेंबर-जानेवारीमध्ये या घटना घडतात. काही ठिकाणी शेतकरी पुढल्या पिकाच्या तयारीसाठी गवत (राब) जाळतात, परिणामी लाखो रु पयांचे चारा-वैरण जळून नुकसान होते. हे गवत आताच कापून सुरक्षित ठेवावे. वनक्षेत्रातील राखीव कुरण, वनक्षेत्रांच्या नर्सरीमधील गवत, वन कार्यालयांच्या आवारातील गवत १५ दिवसांमध्ये कापून त्याचे गठ्ठे बांधून सुव्यवस्थित सुरक्षित जागी गंजी करून ठेवाव्या, अशा सूचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात एकूण ८०० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायत क्षेत्रात दरवर्षी स्थानिक जनावरांची वैरणाची गरज भागवून किमान १ ते २ ट्रक चारा-वैरण मिळाल्यास जिल्ह्याची गरज भागवून इतरत्र शासनाच्या आदेशान्वये पाठविण्यात येईल. बहुतांश शेतकºयांनी भात पीक न घेता भातशेतीवरील अर्धओले वैरण अद्यापपर्यंत शेतामध्ये उपलब्ध आहे. या वैरणीची ग्रामपंचायत क्षेत्रातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थाव्दारे कापणी करून ग्रामपंचायतींच्या आवारामध्ये साठवून ठेवल्यास संभाव्य गवताची हानी टाळून त्याचा सुयोग्य वापर राष्ट्रीय हितासाठी टंचाईवर मात करण्यासाठी करता येईल, अशी भूमिका सूर्यवंशी यांनी मांडली आहे.

शासकीय विभागाच्या माध्यमातून गवत संकलन मोहीम
ज्या शासकीय इमारतीच्या आवारात गवत अद्यापही शिल्लक आहे, अशा सर्व शासकीय विभागातील विभाग प्रमुखांनी किमान एक ट्रक गवत सेवाभावी संस्थांच्या मदतीने कापावे. गवताची गंजी करून ठेवावे. तसेच महसूल विभागाकडील गायरान जमिनी, जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील राज्य रस्त्यांच्या दुतर्फा रांगेत असलेले गवत, औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील पाणी शुद्धीकरण केंद्र महाड व बंद कंपन्यांच्या आवारात असलेले गवत कापून गठ्ठे बांधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: District ready for feeding fodder; Appeal to private industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड