महिलेची छेड काढल्याप्रकरणी चौघांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:44 AM2017-12-12T03:44:38+5:302017-12-12T03:44:53+5:30

वहूर गाव हद्दीतील एस.टी. बस स्टँडवर महाड येथे रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एका लग्नासाठी जाणा-या त्याच गावच्या मोहल्ला येथील एका महिलेची छेड काढणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime against Mahad City Police Station for killing woman | महिलेची छेड काढल्याप्रकरणी चौघांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

महिलेची छेड काढल्याप्रकरणी चौघांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

Next

दासगाव : वहूर गाव हद्दीतील एस.टी. बस स्टँडवर महाड येथे रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एका लग्नासाठी जाणा-या त्याच गावच्या मोहल्ला येथील एका महिलेची छेड काढणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर याच छेड काढणा-याला दुपारी २.३० च्या सुमारास याच गावातील बस स्टँडवर चार जणांनी मारझोड केल्याप्रकरणी चौघांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वहूर गावातील मोहल्ला येथे राहणारी महिला महाड येथे एका लग्नासाठी गावातील एस.टी. बस स्टँडवर रविवारी सकाळी १०.३० वाजता उभी असता त्या ठिकाणी त्याच गावातील रविवारी अब्दुल गफुर चरफरे (४०) या ठिकाणी आला. त्यावेळी या महिलेने त्याला माझ्या मुलांची बेइज्जती का करतोस अशी विचारणा केली असता गफुर याने या महिलेच्या अंगावर धावत जाऊन विनयभंग करत शिवीगाळ करून मारहाण केली.याप्रकरणी या महिलेने गफुर चरफरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गफुर चरफरे हे वहूर गावच्या एस.टी. स्टँडवर उभे असता त्या ठिकाणी फौजान फौवाद झटाम (२८,) आसिम झटाम (४५), रफिक झटाम (५०), सामिद झटाम (३०) यांनी येथे येऊन शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी तक्रार गफुर चरफरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार फौजान झटाम, आसिफ झटाम, रफिक झटाम, सामिद झटाम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि फिर्यादी हे सर्व राहणार वहूर मोहल्ला हद्दीतील आहेत. याप्रकरणी पुुढील तपास पो. उ. निरीक्षक डी. एल. मोरे व पोलीस हवालदार एन.ए. कदम करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

Web Title: Crime against Mahad City Police Station for killing woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा