अलिबागमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयाची अवस्था जैसे थे; डॉक्टरांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:54 PM2019-06-19T23:54:56+5:302019-06-19T23:55:04+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘माझे आरोग्य माझे हक्क’ अभियानाचा फज्जा

The condition of district government hospital in Alibaug was similar; Lack of doctors | अलिबागमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयाची अवस्था जैसे थे; डॉक्टरांची कमतरता

अलिबागमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयाची अवस्था जैसे थे; डॉक्टरांची कमतरता

Next

अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयातील असुविधेबाबत मध्यंतरी महिला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘माझे आरोग्य माझे हक्क’ या अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य व्यवस्थेची चिरफाड केली होती. त्यानंतर आरोग्य व्यवस्थेमध्ये काही सुधारणा होतील अशी भाबडी आशा होती, मात्र आजही जिल्हा सरकारी रुग्णालयात दखल घेण्याइतपतही परिस्थिती सुधारलेली दिसून येत नाही. त्यामुळे ‘माझे आरोग्य माझे हक्क’ हे अभियान राबवून नेमके काय साध्य झाले असा सवाल उपस्थित होत आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. याच ठिकाणी जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख कार्यालये आहेत. पोलादपूरपासून ते खालापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येथे येत असतात. सरकारी रुग्णालय असल्याने येथे उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचीच संख्या अधिक आहे. दोनच वर्षापूर्वी तब्बल १० कोटी रुपये खर्चून जिल्हा सरकारी रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र रुग्णालयामध्ये सातत्याने डॉक्टरांची कमतरता असते.

बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टर रुग्णांना तपासून झाल्यावर त्यांना बाहेरील औषधे घेण्याचा सल्ला देता. कारण सदरची औषधेही रुग्णालयाच्या औषध विभागात उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करतात. बाहेरील औषधे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण निर्माण होते. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी औषधे विविध साहित्यही बाहेरुन आणण्यास सांगितले जाते. याबाबत रुग्ण तसेच नातेवाइकांकडून अनेकदा तक्रारीही झाल्या आहेत.
रायगड जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच राज्यातील अन्य जिल्हा सरकारी रुग्णालयांची स्थिती आहे. रुग्णालयांची स्थिती जाणून घेण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या आधी ‘माझे आरोग्य माझे हक्क’हे अभियान राबवले होते. त्यामध्ये रायगडच्या जिल्हाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती उमा मुंढे यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली होती.

रुग्णालयातील शौचालयातील अस्वच्छता, डॉक्टरांची कमतरता, पत्राच्या शेडखाली ठेवलेली नवजात बालके, प्रसूती कक्षातील अस्वच्छता, अतिदक्षता विभागातील नादुरु स्त यंत्रसामग्री असे विदारक चित्र त्यांना दिसले होेते. जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीतील अहवाल जिल्हाध्यक्ष दीपिका चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजीया खान यांच्याकडे सुपूर्द केला होता. अहवालाबाबत वरिष्ठ स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. सद्यस्थितीत प्रसूती कक्षात अस्वच्छता आहे. स्वच्छतागृहातील कचरा डस्टबीनच्या बाहेर टाकण्यात येत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पंख्यांची असुविधा, कर्मचारी गैरहजर, गरम पाणी नाही, बंद पडलेली यंत्रसामग्री त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत.

सर्वसामान्यांना न्यायाची मागणी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन उभारले मात्र त्यातून नेमके काय निष्पन्न झाले असा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने उपलब्ध अहवालाबाबत योग्य तो निर्णय घेऊन जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेणाºया सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे हे अभियान म्हणजे निवडणुकीआधी मतदारांना दाखवण्यात आलेले प्रलोभनच ठरणार असल्याचे बोलले जाते.

Web Title: The condition of district government hospital in Alibaug was similar; Lack of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.