अनधिकृत झोपड्यांवर सिडकोची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:13 AM2018-12-13T00:13:22+5:302018-12-13T00:13:57+5:30

झोपड्या हटवण्याची सुरक्षा यंत्रणेची होती मागणी

CIDCO's action on unauthorized slums | अनधिकृत झोपड्यांवर सिडकोची कारवाई

अनधिकृत झोपड्यांवर सिडकोची कारवाई

Next

उरण : चारफाटा येथे मागील ३० वर्षांपासून अनधिकृतरीत्या वसविण्यात आलेल्या शेकडो झोपड्या सिडकोने पोलीस बंदोबस्तात बुधवारी जमीनदोस्त केल्या. यावेळी पोलिसांनी शेकाप कार्यकर्ते आणि झोपडीधारकांच्या कडव्या विरोधाला जुमानले नाही. उलट, विरोध करणाऱ्या शेकाप कार्यकर्त्यांसह अनेक झोपडपट्टीवासीयांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.

उरण चारफाटा-ओएनजीसी मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झोपडपट्ट्या वसल्या आहेत. ओएनजीसीसह इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू पाहणाºया या झोपड्या हटविण्याची मागणी ओएनजीसीसह सुरक्षा यंत्रणेकडूनही सातत्याने केली जात होती. मात्र, ३० वर्षांपासून अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्यांना राजाश्रय मिळाल्याने झोपड्यांवर कारवाई करण्यात अडचणी येत होत्या.

अखेर बुधवारी (१२) उरण-चारफाटा येथील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त विठ्ठल दामगुडे, उरण वपोनि निवृत्ती कोल्हटकर, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वपोनि चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी जमा होताच शेकाप कार्यकर्त्यांसह झोपडवासीयांनीही अडथळे निर्माण करीत सिडकोच्या कारवाईस जोरदार विरोध केला. शेकाप कार्यकर्ते आणि झोपडीवासीयांनी सिडको-पोलिसांविरोधात निषेधाच्या जोरदार घोषणाही दिल्या.

सिडको-पोलीस यांच्याशी शेकाप पदाधिकारी आणि झोपडपट्टीवासीयांनी कारवाई थांबविण्यासाठी ४८ तासांची मुदतही मागितली.
सिडको आणि पोलिसांनी याआधीच अनेक वेळा मुदतवाढ दिली होती.
चार महिन्यांपूर्वीही आठ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र, आता चार महिन्यानंतरही कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत कारवाई करण्यास सुरुवात केली.

अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला
या कारवाईच्या विरोधात शेकाप आणि झोपडपट्टीवासीयांनी अडथळा आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, शेकाप-झोपडपट्टीधारकांच्या विरोधाला न जुमानता सिडकोने चारफाटा येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्या बुलडोझर लावून जमीनदोस्त केल्या. या दरम्यान विरोध करणाºया शेकाप कार्यकर्त्यांसह अनेक झोपडपट्टीवासीयांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.

Web Title: CIDCO's action on unauthorized slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको