'शेकाप'चा झाला 'भाकाप', सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी - मुख्यमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 07:45 PM2019-04-18T19:45:49+5:302019-04-18T19:46:38+5:30

शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेसही आहे. अशी महाखिचडी आहे.

Chief Minister criticism on NCP-Congress in Pen Campaign rally | 'शेकाप'चा झाला 'भाकाप', सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी - मुख्यमंत्र्यांचा टोला

'शेकाप'चा झाला 'भाकाप', सोबतीला काँग्रेस, अशी ही महाखिचडी - मुख्यमंत्र्यांचा टोला

Next

पेण - काँग्रेस-राष्ट्रवादीची अनाचारी, दुराचारी, अत्याचारी, भ्रष्टाचारी अशी ही कारकिर्द आपण पाहिली. पण, आता तो जमाना गेला. या मतदारसंघात शेकापने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेसही आहे. अशी महाखिचडी आहे. यांनी सामान्यांचा विचार कधीच केला नाही आणि अगदी मुलभूत गरजांपासून सुद्धा लोकांना वंचित ठेवले असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकापसह काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.

रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण येथे भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ पैशासाठी महाराष्ट्रावर राज्य केले आणि सत्तेतून पैसा अन् पैशातून पुन्हा सत्ता असे एक दृष्टचक्र निर्माण केले. सामान्य माणसांच्या गरजांकडे या पक्षांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आणि अगदी मुलभूत गरजांपासून सुद्धा त्यांना वंचित ठेवले असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत एक नवी कार्यसंस्कृती आम्ही रूजविली आणि गतिमान विकासाचा मार्ग पत्करला. पाणीपुरवठ्याच्या योजना असो की मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प सर्वांना गती दिली. आता तर हा भाग एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध होत आहे. रस्ते, रेल्वे, बंदरविकास, जलवाहतूक अशी मोठी कामे आता होत आहेत. त्यातून दळणवळणाच्या सोयी तर निर्माण होतच आहेत, शिवाय मोठ्या संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत. मासेमार बांधवांसाठी सुद्धा अनेक कल्याणकारी योजना आणि उपाय हाती घेण्यात आले आहेत.

Web Title: Chief Minister criticism on NCP-Congress in Pen Campaign rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.