कंटेनर हाताळणीची क्षमता एक कोटीपर्यंत वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:48 PM2018-10-17T23:48:48+5:302018-10-17T23:49:25+5:30

उरण : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटी)ला सध्याच्या त्यांच्या १८ आरटीजीच्या ताफ्यात आणखी नऊ रबर टायर गॅन्ट्री ...

Capacity handling capacity will increase to one crore | कंटेनर हाताळणीची क्षमता एक कोटीपर्यंत वाढणार

कंटेनर हाताळणीची क्षमता एक कोटीपर्यंत वाढणार

Next

उरण : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटी)ला सध्याच्या त्यांच्या १८ आरटीजीच्या ताफ्यात आणखी नऊ रबर टायर गॅन्ट्री क्रेन्स (आरटीजी) मिळाल्या आहेत. नऊ अतिरिक्त आरटीजीचा ताफा आॅक्टोबर २०१८ मध्ये मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता बीएमसीटीच्या आरटीजीची एकूण संख्या ३६ होणार आहे.

आतापर्यंत ११ वेगवेगळ्या व्हेसल आॅपरेटरनी बीएमसीटीशी संपर्क साधला आहे. भविष्यात नवीन सेवांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आता फेज २ विकासाच्या नियोजन पातळीवर वाटचाल करत आहोत. २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होणार असून, बीएमसीटीची क्षमताही दुपटीने म्हणजेच एक कोटीपर्यंत वाढणार असल्याची माहिती बीएमसीटीचे सरव्यवस्थापक शिवकुमार के. यांनी दिली.
नवीन अत्याधुनिक आरटीजीच्या आगमनामुळे बीएमसीटीकडे आता नऊ क्वे क्रेन्स आणि १००० मीटरच्या सलग क्वे लांबी आणि टर्मिनलपाशी रेल्वे लाइन मजबूत करणारे ४ डीएफसी (डेडीकेटेड फ्राइट कॉरिडोर) यांना पाठबळ पुरविणारे २७ आरटीजी आहेत. नवीन साधने आल्यामुळे बीएमसीटीच्या व्यापारात वाढ होत आहे.


टर्मिनलने आजपावेतो १,५०,००० हून अधिक टीईयूज कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. सरासरी उत्पादनक्षमता ताशी १०० मुव्हजपासून तासाला १४० मुव्हजपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती शिवकुमार के. यांनी दिली.

Web Title: Capacity handling capacity will increase to one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.