रायगड जिल्ह्यात बीएसएनएल इंटरनेट सेवा पुन्हा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:33 AM2018-10-03T04:33:41+5:302018-10-03T04:33:58+5:30

ग्राहक सेवा केंद्रही बंद : ग्राहकांमध्ये धुमसतोय असंतोष

BSNL internet service in Raigad district breaks again | रायगड जिल्ह्यात बीएसएनएल इंटरनेट सेवा पुन्हा खंडित

रायगड जिल्ह्यात बीएसएनएल इंटरनेट सेवा पुन्हा खंडित

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा बीएसएनएल फोन व इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला. इंटरनेट सेवा बंद झाल्याने एटीएम आणि आॅनलाइन आर्थिक व्यवहार ठप्प झाले. बँकांना सुट्टी असल्यामुळे बँकेमध्ये जाण्याची सोय देखील लोकांना राहिली नाही परिणामी, मोठीच गैरसोय झाली. सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी आलेल्यांनाही मोठा फटका बसला. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात एकूण २३ वेळा बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. ऐन गणेशोत्सवात बीएसएनएलच्या या समस्येला सामोरे जावे लागले होते.

बीएसएनएलचे फोन आणि इंटरनेट बंद पडण्याचे प्रकार गेल्या महिन्यापासून वारंवार होत आहे. महामार्गा रुंदीकरणामुळे केबल तुटत असल्याचे कारण दिले जात आहे. बहुतांश सरकारी व्यवस्था आता आॅनलाइन चालतात. सरकारचा देखील आॅनलाइन आणि कॅशलेस व्यवहाराचा अट्टाहास आहे. अशा परिस्थितीत, सरकारी कामात व्यत्यय आणणे वा खंडित करणे चुकीचे आहे. बीएसएनएल इंटरनेट सेवा ठप्प होत असल्याने कंपनीवर गुन्हा दाखल का करण्यात येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बीएसएनएल ग्राहकांप्रती उत्तरदायित्व नाही
बिल भरले नाही, भरण्यास विलंब झाला तर बिल वसुलीकरिता शेकडो मेसेज पाठविणारे बीएसएनएल, त्यांची सेवा ठप्प झाल्यावर वा ती पुन्हा सुरू झाल्यावर सेवा खंडित का झाली होती? या बाबत ग्राहकांना मेसेज पाठवून माहिती देण्याचे उत्तरदायित्व का निभावत नाही, असा सवाल एका गृहिणीने उपस्थित केला.
रायगड जिल्ह्याच्या आॅप्टिकल फायबर केबल(ओएफसी) मध्ये फॉल्ट आल्याने अलिबाग, मुरुडसह जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांतील फोन आणि इंटरनेट सेवा बंद पडली. दरम्यान, पोयनाड जवळ बीएसएनएलची ओएफसी एका खोदकामात जेसीबीमुळे तुटल्याने ही समस्या निर्माण झाली होती.
- सी. व्ही. राव, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, रायगड

गुन्हा दाखल करण्याची मागणी
च्आपत्ती निवारण व्यवस्थेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कार्यरत ‘आपत्ती निवारण कक्षात’ सुट्टीच्या दिवशी किमान एक सरकारी अधिकारी वा कर्मचारी २४ तासांकरिता उपलब्ध असतो. मात्र, बीएसएनएल ग्राहक तक्र ार निवारण कक्ष रविवारसह कोणत्याही सुट्टीच्या दिवशी बंद असतो.
च्बीएसएनएल इंटरनेट सेवा ठप्प असल्याने आॅनलाइन तक्र ार करता येत नाही. बीएसएनएलच्या बेफिकरी बाबत त्यांच्यावर आपत्ती निवारण विषयक कायद्यांतर्गत जिल्हाधिकाºयांनी कारवाई करणे आवश्यक असल्याचा पर्याय कायद्याचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्याने सुचविला.

रसायनीत गती मंदावली
च्रसायनी : शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा मंगळवारी सकाळपासूनच धिम्या गतीने सुरू होती. मात्र, काही काळानंतर सेवा पूर्णत: खंडित झाली. त्यामुळे बँक, पोस्ट कार्यालयांव्यतिरिक्त अन्य आॅनलाइन व्यवहारावर परिणाम झाला. काही विद्यापीठांच्या परीक्षांचे अर्ज विलंब शुल्काने आॅनलाइन भरणे, अर्जाचा फॉरमॅट काढून घेणे, माहिती घेणे, एटीएमने पैसे काढण्यासाठी व आॅनलाइनच्या कामाकरिता विद्यार्थी, ग्राहक सायबर कॅफेकडे हेलपाटे मारत होते.

Web Title: BSNL internet service in Raigad district breaks again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.