घातपात की खून ? कर्जत शहरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:26 AM2017-11-15T02:26:54+5:302017-11-15T02:27:08+5:30

कर्जत शहरातील मानस कॉम्प्लेक्समधील एका गृहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, त्या महिलेच्या मृत्यूबद्दल कर्जत शहरात चर्चेला उधाण आले आहे.

The blood of the death? Suspected death of a woman in Karjat city | घातपात की खून ? कर्जत शहरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

घातपात की खून ? कर्जत शहरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

Next

कर्जत : कर्जत शहरातील मानस कॉम्प्लेक्समधील एका गृहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, त्या महिलेच्या मृत्यूबद्दल कर्जत शहरात चर्चेला उधाण आले आहे. कर्जत पोलीस ठाण्यात या महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून कर्जत पोलिसांकडून त्या मृत्यूबद्दल सावध पावले उचलली जात आहेत.
कर्जत शहरातील मानस कॉम्प्लेक्सचा झपटसिंग कुमान हा रखवालदार आपली पत्नी आणि मुलांसह राहत आहे. त्याची पत्नी लक्ष्मी यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्या महिलेचे पती कुमान यांना सोमवारी दुपारी ३ वाजता घरी परत आल्यानंतर कळली. त्या वेळी लक्ष्मी यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला, तसेच कानाला जखम झाली होती. रखवालदार कुमान याने ही माहिती आपला शेजारी आणि त्यांच्या माध्यमातून कर्जत पोलिसांना सांगितली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकूळ, कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे आणि त्यांचे पथक पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य शिंदे तसेच एस. एस. राजमाने, सचिन व्हसकोटी, पी. एम. पाटील, डी. डी. देशमुख घटनास्थळी दाखल झाले.
लक्ष्मी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा
रु ग्णालयात नेला. कर्जत पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ एक तपास पथक या कामासाठी लावले असून, त्या महिलेचा मृत्यू हा घातपात की त्यांचा खून करण्यात आला आहे याचा शोध कर्जत पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये आहे.

Web Title: The blood of the death? Suspected death of a woman in Karjat city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.