Attempts by the friend to loot, the clash occurred between the two on the dispute | मित्राने के लाखुनाचा प्रयत्न, वादावरून दोघांमध्ये झाली हाणामारी

रोहा : दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन प्राणघातक हल्ला करण्याचा गंभीर प्रकार रोह्यात घडला आहे. पैशाच्या वादावरून दोघांत झालेल्या हाणामारीत धारदार कोयत्याने हल्ला केल्यामुळे एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने मुंबईत अधिक उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
रोहा शहरापासूनजवळ असणाºया आरे बु. गावातील जनार्दन शांताराम बागवे (४२) यास अटक केली. त्याने गावातील त्याचा मित्र परशुराम दळवी याच्या घराजवळ येऊन मोलमजुरी केलेले पैसे का देत नाहीस असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी परशुराम दळवी हा त्यास समजावून सांगण्यासाठी त्याच्या घरापर्यंत गेला असता आरोपी जनार्दन बागवे याने रागाच्या भरात घरातून लोखंडी धारदार कोयता आणून मित्र परशुराम दळवी याच्या डोक्यावर वार करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या परशुराम दळवी यास गावातील निवृत्त मंडळ अधिकारी यशवंत शिंदे, सरपंच सुधाकर शिंदे, मधुकर शिंदे, तुकाराम कडव, गंगाराम खांडेकर आदी ग्रामस्थांनी तातडीने रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानंतर मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या तातडीने मुंबईस हलविण्यास सांगितले.
याबाबत जखमी परशुराम दळवी यांची बहीण तुळसाबाई परशुराम शिंगरे यांनी रोहा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी जनार्दन शांताराम बागवे यास अटक करून त्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे व ठार मारण्याची धमकी देणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, प्रभारी पो.नि.संदीप येडे-पाटील, पोलीस अधिकारी साळुंखे, पो.उ.नि.रणजीत जाधव, गायकवाड, सुर्वे आदी पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट दिली.