अनिकेत तटकरे यांचे जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:13 AM2018-05-25T04:13:19+5:302018-05-25T04:13:19+5:30

अनिकेत तटकरे यांच्या विजयाने संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

Aniket Tatkare's warrant welcome | अनिकेत तटकरे यांचे जंगी स्वागत

अनिकेत तटकरे यांचे जंगी स्वागत

Next

अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विभागीय मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाने संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यावर रत्नागिरी येथून रायगड जिल्ह्यात परत येत असताना रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील पोलादपूर येथे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांचे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महासचिव आमदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांचे स्वागत करण्याकरिता जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद घोसाळकर, महाडचे माजी नगराध्यक्ष मेहबूब कडवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वाय. सी. जाधव, पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती दीपिका दरेकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय सलागरे, सभापती दिलीप भागवत, शेका पक्षाचे अजित कंक आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Aniket Tatkare's warrant welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.