अलिबागचा रिक्षाचालक झाला जीवरक्षक; खाडीत उडी मारून चौघांना वाचवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 03:29 PM2018-06-21T15:29:48+5:302018-06-21T15:55:14+5:30

पूलावरुन खाडीच्या पाण्यात कोसळलेल्या कार मधील चौघांना बुडताना वाचविण्यात यश

Alibaug's autorickshaw driver; Jumped into the bay and saved life! | अलिबागचा रिक्षाचालक झाला जीवरक्षक; खाडीत उडी मारून चौघांना वाचवलं!

अलिबागचा रिक्षाचालक झाला जीवरक्षक; खाडीत उडी मारून चौघांना वाचवलं!

googlenewsNext

जयंत धुळप

रायगड -  उधाणाची भरती चालू असताना अलिबाग-नागाव मार्गावरील बेलीफाटा येथील पुलावरून खाडीत कोसळलेल्या कार मधील चौघांना आपल्या जीवाची पर्वा न करता मोठय़ा धाडसाने खाडीत उडी मारुन बुडताना वाचविणारे चौल येथील बहाद्दर मिनीडोर रिक्षा चालक प्रदीप विश्वनाथ शिंदे यांचा बुधवारी संध्याकाळी अलिबाग पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या हस्ते शानदार सत्कार करुन त्यांची समयसुचकता आणि धाडसाचे कौतूक करण्यात आले. यावेळी अपघातांती बुडताना वाचलेले दिवेकर व घरत कुटुंबिय, संकल्प सिद्धी मिनीडोअर रिक्षा संघटना रेवदंडाचे अध्यक्ष आदेश मोरे, सदस्य सुरेश म्हात्ने, जगदीश पाटील, भरत म्हात्ने आदी उपस्थित होते.

दादा आम्हाला वाचवा..अशी आर्त हाक ऐकली आणि त्याने खाडीत उडी घेतली

अलिबाग जवळील पिंपळभाट येथे राहणारे दिवेकर आणि घरत कुटुंबिय सोमवार दि. 18 जून रोजी नांदगांव(मुरु ड) येथून आपल्या एका नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून ङोन एस्टलो या कारने अलिबागकडे येत होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अलिबाग-नागाव मार्गावरील  बेली फाटा येथील छोटय़ा पुला जवळ कारचे मागील चाक रस्त्याचा खाली उतरल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्नण सुटून गाडी सुरक्षा कठडे नसलेल्या या पुलाच्या उजव्या बाजूकडून खोल खाडीत पडली. भरतीची वेळी असल्याने उधाणाचे पाणी वेगाने वहात होते. याच दरम्यान या कार मागून येणा:या मिनीडोअर रिक्षाचालक प्रदीप विश्वनाथ शिंदे यांनी कार पुलावरून खाली पडल्याचे पाहिले.  दादा आम्हाला वाचवा, दादा आम्हाला वाचवा,  म्हणून कारमधील महिला मदतीकरीता ओरडत होते. शिंदे यांनी क्षणाचाही विचार न करता आपली मिनीडोअर रिक्षा थांबवून कारमधील प्रवाशांना वाचविण्यासाठी खाडीच्या पाण्यात उडी घेतली. 

सुदैवाने कार पाण्यावर तरंगत होती....

कार पाण्यात पडली मात्न सुदैवाने पाण्यावर तरंगत असल्याने कारमधील प्रवासी जिवाच्या आकांताने आरडाओरड करु  लागले. कारचे चालक स्वप्निल दिवेकर (39) यांना थोडेफार पोहोता येत होते. तर कारमधील अन्य चंद्रकांत जनार्दन घरत (55), संपदा जनार्दन घरत (43), सोनाली राजेश दिवेकर (34) यांना पोहोता येत नव्हते. चालक स्वप्निल दिवेकर कसाबसा कारच्या बाहेर आला. तेव्हा त्यांना कोणीतरी आपल्याला वाचिवण्यासाठी येत असल्याचे पाहून मोठा धीर आला. 

महाविद्यालयीन विद्यार्थी अमित बेणारे यानेही धाडसाने घेतली पाण्यात उडी

शिंदे यांच्या रिक्षातून प्रवास करणारा आमली(मुरु ड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थी अमित बेणारे यानेही कारमधील प्रवाशांना वाचिवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. रिक्षाचालक प्रदीप शिंदे यांनी दोघाजणांना कारमधून बाहेर काढले. मात्न एक महिला कारमध्येच असून त्या पाण्यात बुडालेल्या असल्याचे त्यांनी पाहिले. जराही विलंब न करता शिंदे यांनी त्यांनाही मोठय़ा कष्टाने कार बाहेर काढून अमित बेणारे याच्या मदतीने खाडी किनारी आणले. कारच्या काचा उघड्या असल्याने प्रवाशाना बाहेर काढणो सोपे झाले. यावेळी तेथे उपस्थित मिनीडोअर रिक्षा चालक नितीन घरत (सासवणो), सुशील गुंजाळ (खंडाळा) व इतर नागरिकांनी कारमधील जखमी दोन जणांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी शिंदे यांच्या मदतीसाठी धावणारा अमित बेणारे हाही उपस्थित होता. 

देवासारखे धावून आले..आयुष्यभर विसरणार नाही

दिवेकर आणि घरत कुटुंबावर अतिशय बाका प्रसंग ओढावला होता. रिक्षाचालक प्रदीप शिंदे यांनी मोठे प्रसंगावधान दाखवून चारजणांचे प्राण वाचिवले आहेत. एखाद्या अपघातानंतरा मोबाईल शुटींग करणा:यांच्या आजच्या काळात प्रदीप शिंदे यांचे धाडस कौतुकास्पद आहे. प्रदीप शिंदे व अमित बेणारे यांनी आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या या अनन्य साधारण कामाची माहिती वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल,असे सत्काराच्या वेळी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले. तर प्रदीप शिंदे हे आमच्यावर आलेल्या जिवघेण्याप्रसंगात देवासारखे धावून आले. त्यांची ही मदत आम्ही आयुष्यभर विसरणार नाही अशी भानवा यावेळी उपस्थित दिवेकर आणि घरत कुटुंबियांनी व्यक्त केली.

Web Title: Alibaug's autorickshaw driver; Jumped into the bay and saved life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.