पेण अर्बनच्या ठेवी परत मिळवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 04:12 AM2018-07-13T04:12:01+5:302018-07-13T04:12:22+5:30

रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेच्या प्रॉपर्टीज विकण्याच्या दृष्टीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

 Action plan to get back money from pen urban bank | पेण अर्बनच्या ठेवी परत मिळवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

पेण अर्बनच्या ठेवी परत मिळवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

Next

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अंमलबजावणी संचालनालय, तसेच गृहविभागाने या प्रकरणी लक्ष घालून घोटाळ्यातील कोणीही दोषी सुटणार नाही, याकडे लक्ष द्यावे, तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेच्या प्रॉपर्टीज विकण्याच्या दृष्टीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
विधानभवनात झालेल्या बैठकीत पेण अर्बन सहकारी बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांसह राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू यांच्यासह रायगडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अंमलबजावणी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
पेण अर्बन सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याचा फटका जवळपास अडीच लाख ठेवीदारांना बसला आहे. अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात गुंतविली होती. या ठेवीदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने या प्रकरणी गंभीर कार्यवाही होणे गरजेचे आहे. दोषींकडून वसुली करणे, त्यांच्या प्रॉपर्टींची जप्ती करणे, बँकेच्या प्रॉपर्टीची विक्र ी करणे, या संदर्भात सर्व संबंधित विभागांनी कठोरपणे कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.
ते म्हणाले, घोटाळ्यातील कोणत्याही दोषी व्यक्तीला पाठीशी घालण्यात येऊ नये. पोलीस यंत्रणेने तसेच अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी नि:पक्षपणे कारवाई करावी. यासाठी शासन पाठीशी राहील. गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनीही या प्रकरणी स्वत: लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.
फडणवीस म्हणाले की, सिडकोच्या क्षेत्रातील पेण अर्बन बँकेच्या ज्या प्रॉपर्टी सिडकोला खरेदी करणे शक्य आहेत, त्या खरेदी कराव्यात. इतर भागातील प्रॉपर्टीजची खरेदी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी करण्यास म्हाडाला सांगण्यात येईल. या प्रॉपर्टीजच्या विक्र ीतून जास्तीत जास्त ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात येऊ शकतील, असे ते म्हणाले. दोषींवर कडक कारवाई होणे, कोणालाही पाठीशी न घालणे आणि ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणेने कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Web Title:  Action plan to get back money from pen urban bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.