मुरुडमध्ये पाच अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई; वाहतूक पोलिसांकडून पालकांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:30 PM2018-10-12T23:30:35+5:302018-10-12T23:30:50+5:30

शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन देण्याचे फाजील लाड पालकांना चांगलेच महागात पडले आहेत. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून भरधाव वेगाने वाहन चालविण्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या सध्या वाढत आहे.

 Action on five minor drivers in Murud; Traffic police summons to parents | मुरुडमध्ये पाच अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई; वाहतूक पोलिसांकडून पालकांना समन्स

मुरुडमध्ये पाच अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई; वाहतूक पोलिसांकडून पालकांना समन्स

Next

आगरदांडा : शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन देण्याचे फाजील लाड पालकांना चांगलेच महागात पडले आहेत. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून भरधाव वेगाने वाहन चालविण्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या सध्या वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरील अपघातही वाढले असून नाहक बळीही जात आहेत, अशा अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून, मुरुड शहरातील पाच अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शिक्षा मुलांच्या पालकांवर करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियमाप्रमाणे कारवाई करून न्यायालयात हजर केले.
अल्पवयीन मुलाने वाहन चालवून मोडलेल्या नियमांची शिक्षा पालकांना भोगावी लागणार असल्याने आता पालकच मुलांना वाहने चालवण्यास मनाई करतील. शाळा, कॉलेजमध्ये जाणारी मुले पालकांकडे दुचाकी वाहनांची मागणी करतात आणि पालकही ती उपलब्ध करून देतात. मात्र, भरधाव गाड्या चालवून ही मुले अपघातास आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे, त्यामुळे मुरुड शहरात पाच अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली.

नियमांची पायमल्ली
अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहने चालवतात आणि नियमांची पायमल्ली करीत असल्याचे आढळून आले. मुरुड वाहतूक शाखेकडून पाच अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली. पालकांनाही या वेळी बोलावण्यात आले.

Web Title:  Action on five minor drivers in Murud; Traffic police summons to parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.