रायगडमध्ये यंदा ८,४०४ शाईच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:22 AM2019-04-20T00:22:44+5:302019-04-20T00:23:09+5:30

भारतीय लोकशाहीत श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, स्त्री असो वा पुरुष त्यास एकाच मताचा अधिकार आहे.

8,404 ink bottles in Raigad this year | रायगडमध्ये यंदा ८,४०४ शाईच्या बाटल्या

रायगडमध्ये यंदा ८,४०४ शाईच्या बाटल्या

Next

- जयंत धुळप 

अलिबाग : भारतीय लोकशाहीत श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, स्त्री असो वा पुरुष त्यास एकाच मताचा अधिकार आहे. आणि निवडणुकीत एकदा मतदान केल्यावर त्यास पुन्हा मतदान करता येऊ नये वा त्याने पुन्हा मतदान करू नये, यासाठी मतदाराने मतदान केल्यावर त्याच्या उजव्या हाताच्या आंगठ्यापासूनच्या दुसऱ्या बोटाला नखाच्या बाजूला शाई लावून त्याने मतदान केल्याची खूण करण्याची पद्धत आहे. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ही पद्धत अमलात आली आणि त्यास यंदा ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. ही खूण करण्याची शाई म्हसूर येथे तयार होते म्हणून या शाईला म्हैसुरी शाई असेदेखील संबोधले जाते.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि कर्जत या सात विधानसभा मतदारसंघात येत्या २३ एप्रिल २०१९ रोजी होणाºया लोकसभा निवडणुकीतील मतदानाकरिता रायगड जिल्ह्यातील एकूण २२ लाख २५९ मतदारांच्या बोटाला मतदानानंतर शाईने खूण करण्याकरिता एकूण ८ हजार ४०४ शाईच्या बाटल्या वापरण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक साधनसामग्री समितीचे प्रमुख तथा तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
।शाईचा पूर्वइतिहास...
‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखल्या जाणाºया या शाईचा मतदान प्रक्रियेत सर्वप्रथम भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी केला.
या शाईची निर्मिती दक्षिण भारतातल्या म्हैसूर येथील ‘पेंट अ‍ॅण्ड वार्निश लिमिटेड’ या कंपनीकडून करण्यात येते.
सन १९३७ मध्ये या कंपनीची स्थापना तत्कालीन म्हैसूर प्रांताचे महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार यांनी केली.
ही शाई खुल्या बाजारात उपलब्ध नाही. ती केवळ विविध सरकारे आणि निवडणुकीत सहभागी झालेल्या संस्थांनाच विकली जाते. देशातही निर्यात केली जाते.
।शाई ४० सेकंदात सुकते आणि ७२ तास टिकून राहते
सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर करून करण्यात येणाºया या शाईचा पाण्याशी संपर्क आला तरी ती पुसली जात नाही. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तशी ही शाई निघून जाते. बोटावर लावल्यावर ही शाई केवळ ४० सेकंदात सुकते आणि किमान ७२ तास टिकून राहते.

Web Title: 8,404 ink bottles in Raigad this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.