युथ हॉस्टेल आयोजित 26 वी राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 12:17 PM2017-11-18T12:17:57+5:302017-11-18T12:18:25+5:30

रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे

The 26th state-level Raigad Pradakshana campaign, organized by Youth Hostel | युथ हॉस्टेल आयोजित 26 वी राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहीम

युथ हॉस्टेल आयोजित 26 वी राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहीम

Next

जयंत धुळप
रायगड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याच्या राजधानीच्या दूर्गराज रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर 2017 रोजी करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेच्या सहभाग आवाहनपत्नचे प्रकाशन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखेचे कार्याध्यक्ष व गिर्यारोहक रमेश केणी यांच्या हस्ते गुरूवारी रायगड जिल्हा परिषदेत करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून रायगडची संवर्धन व विकासाकरिता सर्वप्रथम निवड
देशातील ऐतिहासीक गडकिल्ले ही तरण पिढीची स्फूर्तीस्थाने करणो आणि गतवैभवाच्या या ऐतिहासिक साक्षीदारांचे सवर्धन आणि विकास करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई जवळच्या समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणी प्रसंगी बोलताना जाहिर करुन, या योजनेंतर्गत रायगड किल्ल्याची देशात सर्वप्रथम संवर्धन आणि विकासाकरीता निवड केली असल्याने, यंदाच्या 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणोचे महत्व आगळे आहे. या प्रदक्षिणोत राज्यभरातील युवक-युवतींनी सहभागी होवून महाराजांप्रती आदर व्यक्त करावा असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी या निमीत्ताने बोलताना केले आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवशी प्रदक्षिणार्थी सोबत प्रत्यक्ष सहभागी होणार
दरम्यान रायगड किल्ला संवर्धन आणि विकास योजनेचे प्रमुख रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवशी या 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणोमध्ये आपल्या रायगड किल्ला विकास व संवर्धन यंत्नणोतील वरिष्ठ अधिका:यांच्यासह प्रदक्षिणार्थीसोबत सक्रि य सहभागी होणार असल्याचे डॉ.सूर्यवशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले. रायगड किल्ला विकास योजनेअंतर्गत रायगड प्रदक्षिणा मार्ग तयार करण्याचेही काम नियोजित विकास योजनेमध्ये आहे. त्याच अनुषंगाने प्रत्यक्ष प्रदक्षिणार्थीच्या समवेत सहभागी होवून रायगड प्रदक्षिणा मार्गाची पहाणी करुन या रायगड प्रदक्षिणा मार्गाच्या कामास अंतिम स्वरुप देण्याचा मनोदय डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.

इतिहास अभ्यासक शिल्पा परब-प्रधान आणि एव्हरेस्ट विर सुरेंद्र चव्हाण मार्गदर्शन करणार
दरम्यान रायगड प्रदक्षिणोत सहभागी होणा:या प्रदक्षिणार्थीना रायगड आणि परिसराच्या इतिहासाची माहिती देण्याकरिता ज्येष्ठ शिवकालीन इतिहास अभ्यासक शिल्पा परब-प्रधान या उपस्थित राहाणर आहेत, तर गियोरोहण व गडभ्रमंतीचे अनन्यसाधारण महत्व प्रदक्षिणार्थीना सांगून आपले अनूभव कथन करण्याकरिता भारतीय एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होत एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवणारे एव्हरेस्टविर सुरेंद्र चव्हाण आवर्जून उपस्थित राहाणार असल्याची माहिती यावेळी युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखेचे कार्याध्यक्ष व गिर्यारोहक रमेश केणी यांनी यावेळी दिली.

राज्यभरातून युवक-युवती मोठय़ा प्रमाणावर सहभागी होणार 
रायगड प्रदक्षिणा गेली 26 वर्ष आयोजित करण्यात येत असून छत्नपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या ऐतिहासिक भूमितील या  रायगड प्रदक्षिणोत राज्य व परराज्यातील युवक मोठय़ा संख्येने आजवर सहभागी झाले आहेत. यंदा देखील राज्यभरातून युवक-युवती मोठय़ा प्रमाणावर या रायगड प्रदक्षिणोत सहभागी होणार असल्याची माहिती युथ क्लब महाडचे अध्यक्ष संजीव मेहता यांनी दिली आहे. या रायगड प्रदक्षिणोमध्ये सहभागी होण्याकरीता मुंबई येथे युथ हॉस्टेल महाराष्ट्र राज्य शाखा कार्यालय, परळ-मुंबई (क्22-24126क्क्4)येथे संपर्क साधावा असे आवाहन रमेश केणी यांनी केले आहे.
 

Web Title: The 26th state-level Raigad Pradakshana campaign, organized by Youth Hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड