जिल्ह्यात कोकण मतदार संघासाठी १९,९१८ मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:42 AM2018-06-19T02:42:40+5:302018-06-19T02:42:40+5:30

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.

19,181 voters for Konkan constituency in the district | जिल्ह्यात कोकण मतदार संघासाठी १९,९१८ मतदार

जिल्ह्यात कोकण मतदार संघासाठी १९,९१८ मतदार

googlenewsNext

अलिबाग : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. २५ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील तब्बल १९ हजार ९१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यामध्ये ३६ मतदान केंद्रे राहणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अभय यावलकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये सरकारी, तसेच निमसरकारी आस्थापनातील कर्मचाºयांचा समावेश आहे. या निवडणुकीतील आणखीन विशेष बाब म्हणजे मतदानाच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी वेळ आयोगाने निश्चित केली आहे.
मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करु न नंतर नेरु ळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी २८ जून रोजी तेथेच होणार आहे. मतदानसंदर्भातील तक्रार निवारण करण्यासाठी सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांना निवडणुकीकरिता लागणाºया विविध परवानग्या या एकाच ठिकाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे.
>एकूण मतदान केंदे्र ३६
पनवेल येथे ९ मतदान केंदे्र ठेवण्यात आली आहेत. पेण, अलिबाग येथे प्रत्येकी तीन कर्जत, उरण येथे दोन, अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका मतदान केंद्राचा समावेश आहे.
१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष सर्वाधिकनिरंजन डावखरे भाजपा, नजीब मुल्ला- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, संजय मोरे-शिवसेना या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह ११ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये अमोल पवार, अ‍ॅड. अरु ण आंबेडकर, कल्पेश किणी, गोकुळ कदम, रती जाधव, डॉमनिका पासकल डाबरे, सुवर्णा पाटील, दिलीप भोईर, मिलिंद कांबळे, सुनील तोटावार, हिंदूराव रमेश यशवंत यांचा समावेश आहे.

Web Title: 19,181 voters for Konkan constituency in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.