तरुणांनी उभारली सुरक्षित वाहतूकीची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 04:12 PM2018-03-18T16:12:50+5:302018-03-18T16:12:50+5:30

मैत्रयुवा फाऊंडेशनच्यावतीने वाहतूक पाेलिसांसह वाहतूकीबाबत जनजागृती करण्यात येणार असून, मैत्रयुवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते दर शनिवार अाणि रविवार या दिवशी शहरातील विविध चाैकांमध्ये वाहतूक नियमन करणार आहेत.

youth in traffic awareness | तरुणांनी उभारली सुरक्षित वाहतूकीची गुढी

तरुणांनी उभारली सुरक्षित वाहतूकीची गुढी

Next
ठळक मुद्देवाहतूकीबाबत जनजागृती करणार ट्रफिक अॅम्बॅसिडरमैत्रयुवा फाऊंडेशनचे 150 ते 200 स्वयंसेवक हाेणार सहभागी

पुणे : तरुणांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत, तरुण भरधाव गाड्या चालवत असतात असे आपण नेहमीच ऐकत असतो. तरुणाई जोशात वाहन चालवत असते त्यामुळे अपघात होतात असेही म्हंटले जाते. पुण्यातील मैत्रयुवा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा समज दूर करण्याचा विडा उचलला असून या फाऊंडेशनच्या वतीने संकल्प २०१८ हे अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत आज टिळक चौकात सुरक्षित वाहतूकीची गुढी उभारण्यात आली. 
    गुढी सुरक्षिततेची, गुढी स्वयंशिस्तीची, गुढी सतर्कतेची, गुढी नियमांची, असा सुरक्षित वाहतूकीचा संदेश देत सुरक्षित वाहतुकीची गुढी पुण्यातील वाहतूक पोलिस आणि तरुणाईने एकत्रित येऊन उभारली. वाहतुकीचे सर्व नियम पाळत स्मार्ट पुण्याची वाहतूक व्यवस्था देखील स्मार्ट करु अशी ग्वाही तरुणांनी यावेळी वाहतूक पोलिसांना दिली. या तरुणांना ट्रफिक अ‍ॅम्बॅसिडर म्हणून संबोधण्यात येणार असून हे मैत्रयुवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शहरातील विविध चौकांमध्ये दोन तास वाहतूक पोलीसांसह वाहतूक नियमन करणार आहेत. 
    विशेष म्हणजे या फाऊंडेशनचे तरुण हे विविध क्षेत्रात कार्यरत असून आपल्या शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी या विचाराने ते स्वयंस्फुर्तीने या उपक्रमात सहभागी झाले आहेत. याविषयी बोलताना मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे म्हणाले, आमच्या फाऊंडेशनच्यावतीने मैत्रीय कट्टा चालवला जातो. तेथे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी तरुणांनी वाहतूक नियमनामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन केले होते. त्यावर आम्ही सर्वांशी चर्चा करुन दर शनिवार, रविवार वाहतूक पोलीसांसह वाहतूक नियमन करण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर आम्ही रस्त्यावर उतरुन पोलीसांसोबत विविध सणही साजरे करणार आहोत. 
    लोकमतशी बोलताना प्रभाकर ढमाले म्हणाले, मैत्र युवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते स्वेच्छेने या उपक्रमात सहभागी होत आहेत. वाहतुकीचे नियम पाळायला हवेत हा संदेश चांगल्या पद्धतीने ते नागरिकांपर्यंत पोहचवू शकतील. यासाठी त्यांना ट्रफिक अ‍ॅम्बॅसिडर म्हणून संबोधण्यात येणार आहे.

Web Title: youth in traffic awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.