"मी अमोल काटकर आत्महत्या करतो" हे त्याने सोशल मीडियावर लिहिलं आणि घडलं काही असं....  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:15 PM2019-04-18T12:15:54+5:302019-04-18T12:21:16+5:30

माझ्या बच्चूला सांभाळून घ्या आणि प्लिज मला माफ करा. असा संदेश सोशल मिडियावर पाठवत बुधवारी सायंकाळी आत्महत्या करण्याकरिता खंडाळ्यातील अमृतांजन ब्रिज परिसरात तरुण आला. 

Youngster write on social media about his suicide plan | "मी अमोल काटकर आत्महत्या करतो" हे त्याने सोशल मीडियावर लिहिलं आणि घडलं काही असं....  

"मी अमोल काटकर आत्महत्या करतो" हे त्याने सोशल मीडियावर लिहिलं आणि घडलं काही असं....  

googlenewsNext

पुणे : 'श्री स्वामी समर्थ' मी तुमचा अमोल काटकर आज आत्महत्या करतो आहे, जुन्या मुंबई पुणे महामार्गावर माझी दुचाकी गाडी क्र. (MH 01 BX 8663) आहे. माझी गाडी जिथे असेत तिथे जवळचा माझा मृतदेह भेटेल, सर्वांना जाताना एक विनंती आहे, माझ्या बच्चूला सांभाळून घ्या आणि प्लिज मला माफ करा. असा संदेश सोशल मिडियावर पाठवत बुधवारी सायंकाळी आत्महत्या करण्याकरिता खंडाळ्यातील अमृतांजन ब्रिज परिसरात तरुण आला. अमोल काटकर नावाचा हा युवक मुंबई भागातून आला होता. हा मेसेज पोलीस यंत्रणेला मिळाल्यानंतर महामार्ग वाहतुक शाखेच्या पोलीस अधिक्षक रुपाली अंभुरे यांनी सर्व पोलीस ठाण्यासह अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेच्या सदस्यांना संदेशाची माहिती दिली व सुरु झाली सर्च अमोल काटकार मोहिम.

 बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास सर्व यंत्रणांनी खंडाळा भागात शोध मोहिम सुरु केली यामध्ये खालापुरचे विभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील तसेच खोपोली, खालापुर, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी खंडाळा घाटातील दर्‍यांमध्ये शोध सुरु केला. अमृतांजन पुलाचा परिसर, मंक्की हिलकडील भाग शोधत असताना अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेच्या सदस्यांना सनसेट पाॅईट भागात अमोलची गाडी मिळून आली. गाडी मिळालेल्या भागात पोलीसांची परवानगी घेऊन अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, धर्मेंद्र रावळ, अमोल कदम, अमोल बलकवडे, शुभम साठेलकर, विवेक रावळ, उमेश मोरे, अजय सोनवणे, लक्ष्मण, मंगेश, बंटी कांबळे व पोलीस यांच्या वेगवेगळ्या टिम तयार करत दरीत शोध मोहिम सुरु करण्यात आली. 

रात्र वाढत चाललेली असताना अमोलचा मात्र शोध लागत नव्हता, दरीच्या तळापर्यत जाऊन सर्व टिमा पुन्हा वर आल्या. ती न तास शोध सुरु होता, रात्री दहा वाजता सकाळी पुन्हा शोध सुरु करु असे ठरले. त्यावेळी शेवटचा प्रयत्न म्हणून वाघजई देवी मंदिराच्या मागील बाजुला शोधकार्य केले असता त्याठिकाणी सुस्थितीत मात्र मद्यधुंद अवस्थेत अमोल  बसलेला मिळून आला. अमोलला जिवंत शोधून काढल्याचा मोठा आनंद पोलीस प्रशासनासोबत अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेच्या सर्व सदस्यांच्या चेहर्‍यावर पसरला होता. मात्र हा तरुण ऐवढा हताश का झाला, त्याच्या आयुष्यात नेमकी कोणती घटना घडली, हा बच्चू कोण आहे या सर्व घटनांचा तपास व प्रश्नांचा शोध लोणावळा शहरचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड  घेत आहेत.

Web Title: Youngster write on social media about his suicide plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.