चिंताजनक ! उजनी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावतेय : उणे ३२.५३ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 07:00 AM2019-04-26T07:00:00+5:302019-04-26T07:00:01+5:30

रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत आहे.

Worried! Ujani reservoir water level drops sharply: minus 32.53 percent | चिंताजनक ! उजनी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावतेय : उणे ३२.५३ टक्के

चिंताजनक ! उजनी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावतेय : उणे ३२.५३ टक्के

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : पाण्याअभावी अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान

इंदापूर  : उजनी जलाशयाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत असल्याने, उजनी धरण खूपच उघडे पडलेले व भकास दिसत आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ११० टक्के भरलेले धरण सात महिन्यांतच उणे ३२.५३ टक्केपर्यंत आलेले आहे. यामुळे इंदापूर तालुका व सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

उजनीच्या पट्ट्यातील अनेक गावांतील शेतकरी यांना या संकटाचा सामना करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाण्याअभावी शेतजमिनी कोरड्या पडून बागायत पिकांचे व जनावरांच्या चाऱ्यांचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 
दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेले आहे. रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत आहे. पावसासाठी अजून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार असून, सोलापूरसह पुणे जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळी खूप कमी झाली आहे. विहिरी व बोअरवेल यांनी तर मार्च महिन्यापूर्वी तळ गाठला असल्याने पाण्याची गंभीर अवस्था उजनी पट्ट्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांना पाण्याचे नियोजन तर अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे. 
चौकट  
  उजनीच्या कालवा व बोगद्याचे तोंड सध्या बंद पडले असून, उजनी धरणाच्या पुढील पट्ट्यात पंढरपूर, सांगोला या भागात शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता पाऊस पडल्यानंतरच, धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर पुढे कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे.
चौकट  
  सध्या उजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे. एकूण टीएमसी ४६.२३ आहे. तर उपयुक्त टीएमसी उणे १७.४३ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता. तर यंदा तेच धरण  उणे मध्ये  गेले आहे.
____________________________________________

Web Title: Worried! Ujani reservoir water level drops sharply: minus 32.53 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.