World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 08:05 PM2019-06-21T20:05:44+5:302019-06-21T20:08:25+5:30

फ्रान्समध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय महाेत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळालेल्या केहेन बॅण्डच्या कलाकारांशी खास बातचीत

World Music Day: A combination of Classical and western by kehen band | World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड

World Music Day : क्लासिकल वेस्टनचा मिलाफ करणारा "केहेन" बॅण्ड

Next

पुणे : क्सासिकल संगीताला सर्वसामान्य जनतेपर्यंत पाेहचविण्यासाठी क्सासिकल आणि वेस्टन संगिताचा मिलाफ करुन रचना सादर करण्याचा अभिनव प्रयाेग पुण्यातील केहेन बॅण्डकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फ्रान्स मधील एका आंतरराष्ट्रीय महाेत्सवामध्ये सादरीकरण करण्यासाठी जगभरातील बाराशे बॅण्डमधून केहेन या बॅण्डची निवड झाली हाेती. या महाेत्सवामध्ये सादरीकरण करणारा भारतातील केहेन हा एकमेव बॅण्ड हाेता. 

प्रणाली काळे, अनुप गायकवाड, प्रफुल सोनकांबळे आणि विश्वनाथ गोसावी या चाैघांनी या बॅण्डची सुरुवात केली. गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकवत असताना आपला एखादा बॅण्ड सुरु करावा असा विचार त्यांच्या डाेक्यात आला. आणि सुरवात झाली केहेन बॅण्डची. केहेन हा उर्दू शब्द आहे. त्याचा अर्थ एखादी गाेष्ट समाेरच्याला पटवून सांगणे. क्लासिकल संगीत एका ठराविक वर्गापूरतं मर्यादित न राहता ते सर्वसामान्य लाेकांपर्यंत कसं पाेहचेल या उद्देशाने या चाैघांनी क्लासिकल आणि वेस्टन संगीताचा मिलाफ करण्याचा निर्णय घेतला. तशा काही रचना ही त्यांनी रचल्या. त्याला रसिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांची फ्रान्सच्या महाेत्सवासाठी निवड झाली. 

केहेनबद्दल आणि या नव्या प्रयाेगाबाबत बाेलताना प्रणाली म्हणाली, गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकवत असतानाचा आपला बॅण्ड सुरु करावा असा विचार आला. फ्रान्सच्या महाेत्सवाबद्दल जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा त्यासाठी आम्ही अधिक तयारी केली. त्यातून अनेक नव्या रचना तयार झाल्या. प्रफुल म्हणाला, केहेन हा मुळ उर्दू शब्द आहे. त्याचा अर्थ काहीतरी सांगणे, समाेरच्याला पटवून देणे. आम्ही आमच्या बॅण्डच्या माध्यमातून इंडियन क्लासिकल, वेस्टन आणि इतर संगिताचा मिलाफ करुन आम्हाला जे मांडायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न आमच्या रचनांमधून केला आहे. 

फ्रान्समधल्या अनुभवाबाबत बाेलताना अनुप म्हणाला, फ्रान्समधल्या फेस्टिवलबद्दल समजल्यावर आपण यात सहभागी हाेऊयात असं आम्हा सर्वांनाच वाटलं. त्यानंतर आम्ही सर्वांनीच त्यासाठी जाेरदार तयारी सुरु केली. आमच्या तयारीचं फळ आम्हाला मिळालं आणि आमची महाेत्सवासाठी आमची निवड झाली. तिकडे गेल्यानंतर जगभरातील अनेक बॅण्ड पाहायला मिळाले. त्यांचे सादरीकरण, त्यांच्या रचना ऐकायला मिळाल्या. आमचं हे पहिलंच सादरिकरण हाेतं आणि तेही परदेशात सादरीकरण करण्याची आम्हाला संधी मिळाली. 

Web Title: World Music Day: A combination of Classical and western by kehen band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.