पुणे : ‘आॅनलाईन पाकिटमारी’चा महिला न्यायाधीशाला फटका बसला असून, या बिनचेहऱ्याच्या चोरट्याने त्यांच्या खात्यामधून ४७ हजार ९३० रुपये काढून घेतले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन डेक्कन पोलिसांकडे वर्ग
केला आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा डेक्कन पोलिसांकडे वर्ग केला आहे. डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या व्यवहारांबाबत बँकेकडून माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर हे पैसे कोठून चोरण्यात आले याची माहिती समजणार असल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे)
सुचेता खोकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)