कात्रज परिसरात घरफोड्या करणारी रेकॉर्डवरील महिला भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:54 PM2017-11-11T12:54:55+5:302017-11-11T15:30:48+5:30

कात्रज परिसरात घरफोडी करणारी रेकॉर्डवरील महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली. तिच्याकडून एकूण ३ लाख ११ हजार ७००चा माल जप्त करण्यात आला.

women thief arrested by Bharti University police in Katraj area | कात्रज परिसरात घरफोड्या करणारी रेकॉर्डवरील महिला भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

कात्रज परिसरात घरफोड्या करणारी रेकॉर्डवरील महिला भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देझडती घेतली असता मिळून आले १ नेकलेस, २ कानातील टॉप्सएकूण ३ लाख ११ हजार ७००चा माल जप्त

पुणे : कात्रज परिसरात घरफोडी करणारी रेकॉर्डवरील महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली. भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी तिला अटक केले.
घरफोड्यांना प्रतिबंध व्हावा, म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशावरून पोलीस उपनिरक्षक शिवदास गायकवाड पथकासह गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी सुमीत मोघे यांना मिळालेल्या माहितीनुसार, शहरात विविध ठिकाणी घरफोडी, चोरी करणारी महिला आरोपी लक्ष्मी अवघडे उर्फ लक्ष्मी विक्रम भिसे (वय ३०, रा. मु. पो. नाडे नवा रस्ता, ता. पाटण, जि. सातारा) हिने २ दिवसापूर्वी राजस सोसायटी भागातील एका बंगल्यात घरफोडी चोरी केली असून त्यातील काही सोने विकण्यासाठी त्रिमूर्ती चौक, आंबेगाव बुद्रुक येथे येणार असल्याचे समजले. तेव्हा सापळा रचून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे यांनी तिला ताब्यात घेतले. महिला कर्मचार्‍यांच्या मदतीने झडती घेतली असता १ नेकलेस, २ कानातील टॉप्स मिळून आले. अधिक तपास केला असता तिच्याकडील एकूण १०२ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ११ हजार ७००चा माल जप्त करण्यात आला. तिला अटक करुन न्यायालयात हजर केले असता तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपआयुक्त प्रवीण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार, भिमराव पुरी, समीर बागसिराज, बाबा नरळे, योगेश सूळ, सुमीत मोघे, विक्रम खिलारे, अजित कोकरे, महिला कर्मचारी राणी शिंदे, सोनाली झगडे या पथकाने केली.

Web Title: women thief arrested by Bharti University police in Katraj area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.