महिलांनो, न्यूनगंड सोडा; ध्येय समोर ठेवा, राधिका राणे-डोईजोडे यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:40 AM2018-03-08T03:40:59+5:302018-03-08T03:40:59+5:30

सुदृढ राहण्याची आणि आकर्षक दिसण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीमध्ये असते; पण लोक काय म्हणतील, या विचारातून त्या अनेक प्रकारचे न्यूनगंड मनात ठेवून आपल्या इच्छा पूर्ण करीत नाहीत. मला वाटते, भविष्यात पश्चात्ताप करण्यापेक्षा न्यूनगंड सोडून आपल्या आवडत्या गोष्टी करणे गरजेचे आहे.

 Women, low-yield soda; Go ahead, Radhika Rane-Dojoday's advice | महिलांनो, न्यूनगंड सोडा; ध्येय समोर ठेवा, राधिका राणे-डोईजोडे यांचा सल्ला

महिलांनो, न्यूनगंड सोडा; ध्येय समोर ठेवा, राधिका राणे-डोईजोडे यांचा सल्ला

Next

पुणे - सुदृढ राहण्याची आणि आकर्षक दिसण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीमध्ये असते; पण लोक काय म्हणतील, या विचारातून त्या अनेक प्रकारचे न्यूनगंड मनात ठेवून आपल्या इच्छा पूर्ण करीत नाहीत. मला वाटते, भविष्यात पश्चात्ताप करण्यापेक्षा न्यूनगंड सोडून आपल्या आवडत्या गोष्टी करणे गरजेचे आहे. आपले ध्येय मनात ठेवून जिद्दीने काम केले पाहिजे, असा सल्ला प्रसिद्ध शेफ आणि मॉडेल राधिका राणे-डोईजोडे यांनी दिला. 
राधिका म्हणाल्या, ‘‘लहानपणापासूनच शेफ होण्याची आणि मॉडेलिंगची आवड होती; पण हॉटेलच्या कामामध्ये व्यस्त असल्याने मला मॉॅडेलिंग करणे शक्य झाले नाही. २००४मध्ये मी कोरेगाव पार्कमध्ये नॉटी एंजल कॅफे सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मॉडेलिंग करायचे राहून गेले. हॉटेल, घरातील काम, मुलाचा सांभाळ यांमध्ये व्यस्त झाले. त्यातूनही काही वेळ काढून मी थोडी-थोडी तयारी करीत होते. २०१७ मध्ये मिसेस इंडिया इंटरनॅशनल पॅजंट शोमध्ये भाग घेतला. त्या शोमध्ये मला ‘मिसेस फोटोजेनिक’ टायटल मिळाले. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. ८ महिने मी डाएटवर होते.’’
‘प्रत्येक स्त्रीने आपले स्वप्न पूर्ण केले पाहिजे. जर आपण मेहनत केली तर यश आपलेच असते. यासाठी आपण पुढे आले पाहिजे,’ असे सांगून राधिका म्हणाल्या, ‘‘प्रत्येक गृहिणी ही कामामध्ये इतकी व्यस्त असते, की तिला स्वत:कडे पाहण्यास वेळ नसतो. कधी काळी माझेही असेच होते; पण मी काम करूनही स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि अजूनही घेत आहे. प्रत्येक स्त्रीने मेहनत करीत आनंदी राहणे गरजेचे आहे.’’ 
मला मॉडेल व्हायचे होते, त्यासाठी व्यायाम, आहार याकडे काटेकोर लक्ष दिले. शरीराच्या सुदृढतेसाठी व्यायाम आवश्यक आहे. बहुतांश स्त्रिया आपल्या वयाला लाजून जिममध्ये व्यायामाला जात नाहीत. त्यांना वाटते, की या वयात आपल्याला शोभणार नाही; पण याच विचाराने त्या मागे पडतात.
आपल्या स्वत:साठी तरी जिमला जाणे गरजेचे आहे. शक्य नसेल तर चालणे, धावणे, योग आणि घरच्या घरी तरी व्यायाम केलाच पाहिजे. त्याचबरोबर संतुलित आहार घेणेही आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे स्त्रीने आपली तुलना इतरांशी करू नये, तुम्ही जशा आहात तसे वागा. यश-अपयश याचा विचार न करता जर प्रयत्न केले तर यश नक्कीच पदरात पडेल. आपले लक्ष्य ठरवा आणि तशी कृती करा. यातून कोणतीही महिला यशाला गवसणी घालू शकते.’’
‘‘फक्त डाएटिंग केल्याने महिलांना दीर्घकालीन फायदा होऊ शकतो, असे नाही. त्यासाठी योग्य व्यायाम नियमितपणे केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. स्त्रियांनी कामात कितीही व्यस्त असले तरी स्वत:च्या फिटनेससाठी वेळ देणे गरजेचे आहे. धावपळीचे आयुष्य असणाºया स्त्रियांनी हे जाणले पाहिजे, की जीवनात जास्तीत जास्त गोष्टी करून त्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी ‘माझा स्वत:चा वेळ’ असणे आवश्यक आहे. मीही रोजच्या आयुष्यात एक केवळ झगडणारी महिला होते. जिद्दीने कष्टाला ध्येयाची जोड देत तुम्ही पुढे निघालात तर यश नक्की मिळते. हे मी स्वत: अनुभवले आहे. हे सगळे महिलांपुढे जेव्हा मी माझ्या कार्यशाळांमध्ये सांगते तेव्हा मला त्यांच्या डोळ्यांत नवा विश्वास दिसतो.
‘‘महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. हे सतत सांगण्याची सध्या गरज आहे आणि त्यात मी माझ्या परीने माझा वाटा उचलते. आत्मविश्वास तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे, ती गुरुकिल्ली महिलांनी एकमेकींना पुढे सोपवून ताठ मानेने जगायला शिकले पाहिजे आणि त्याचे मूळ तुमच्या सुदृढ शरीर आणि निकोप मनात असते,’’ असे राधिका यांनी सांगितले.
 

Web Title:  Women, low-yield soda; Go ahead, Radhika Rane-Dojoday's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.