शरद महोत्सवातील कलाकारांना टीव्ही शोमध्ये संधी देणार - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:31 AM2018-12-25T00:31:20+5:302018-12-25T00:32:29+5:30

शरद युवा महोत्सव २०१८ मध्ये नृत्य आणि वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये ज्या कलाकारांनी प्रावीण्य मिळवलेले आहे, अशा कलाकारांना टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये संधी देण्यासाठी टेलिव्हिजन शोच्या नियोजन मंडळाशी चर्चा करून तेथे संधी देण्यात येईल

will give an opportunity to the artists of the Sharad Festival to be screened in the TV show - Supriya Sule | शरद महोत्सवातील कलाकारांना टीव्ही शोमध्ये संधी देणार - सुप्रिया सुळे

शरद महोत्सवातील कलाकारांना टीव्ही शोमध्ये संधी देणार - सुप्रिया सुळे

Next

इंदापूर : शरद युवा महोत्सव २०१८ मध्ये नृत्य आणि वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये ज्या कलाकारांनी प्रावीण्य मिळवलेले आहे, अशा कलाकारांना टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये संधी देण्यासाठी टेलिव्हिजन शोच्या नियोजन मंडळाशी चर्चा करून तेथे संधी देण्यात येईल अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
इंदापूर शहरात व विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवस जल्लोषात चालू असलेल्या शरद युवा महोत्सवाचे बक्षीस वितरण खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील उपस्थित होते.
महोत्सवाचे नियोजन नगरसेवक श्रीधर बाब्रस निलेश राऊत व त्यांच्या टीमने केले.
यावेळी महारुद्र पाटील, प्रताप पाटील, शिवाजीराव इजगुडे, पुणे प्रविण माने, अभिजीत तांबिले,अनिल राऊत, आदी उपस्थित होते. शरद युवा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थी असे : छायाचित्र स्पर्धा -सचिन भागवत, निबंध स्पर्धा - प्राची नांगरे, वैयक्तिक वाद्य -प्रविण विलास साठे, लघुपट निर्मिती - मयुरी काशीद, वक्तृत्व स्पर्धा - हनुमंत देवकाते, वैयक्तिक गायन - शिवम जाधव , वैयक्तिक नृत्य स्पर्धा- श्रीकृष्ण बोडके, मुकाभिनय सांघिक- गौरी अभंग ( जेबीव्हीपी टीम) इंदापूर, काव्यवाचन - स्वाती कडू, प्रहसन ( विडंबननाट्य )- स्वप्नील कुचेकर विद्या प्रतिष्ठाण कॉलेज आॅफ अ‍ॅग्रीकलचर बारामती, ढोल - ताशा स्पर्धा -श्री इन्द्रेश्वर ढोल ताशा पथक इंदापूर, समूह नृत्य -बीएमटी ग्रुप बारामती.

खासदारांनी वाजविला ढोल..!
शरद युवा महोत्सव इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणावर सुरू असताना त्यातील ढोल - ताशा स्पर्धा इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणावर सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. स्पर्धा पहात असताना त्याही पुढे सरसावल्या आणि मुलांमध्ये मिसळून ढोल घेवून वाजवायला सुरवात केली. त्यामुळे स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत झाला.

Web Title: will give an opportunity to the artists of the Sharad Festival to be screened in the TV show - Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.