दक्षिण कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:41 AM2018-08-19T00:41:27+5:302018-08-19T06:46:42+5:30

मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार वर्षाव

Widespread rain in south Konkan, Vidharbha | दक्षिण कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

दक्षिण कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

googlenewsNext

पुणे : मराठवाड्यातील जालना, वसमतसह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यातील कणकवली ६०, वैभववाडी ५०, भिरा, देवगड, मंडणगड, म्हसळा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील राधानगरी १००, महाबळेश्वर ८०, चंदगड, गगनबावडा ५०, आजरा, ओझरखेडा, पेठ, वेल्हे ५० मिमी पाऊस झाला़ तसेच अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या होत्या.
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. जालना येथे शनिवारी सकाळपर्यंत १६० मिमी, वसमत येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. औंढा नागनाथ ५०, केज, कंधार, लातूर २०, हिमायतनगर, जिंतूर, किनवट, मंठा, उस्मानाबाद, पूर्णा, उदगीर १० मिमी पाऊस पडला होता. विदर्भात चांदूर बाजार ७०, अमरावती ५०, अहिरी, बत्कुरी, भद्रावती, चांदूर, चिमूर, धामणगाव, सावनेर ३० मिमी पाऊस झाला असून आणखी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या होत्या.

१९ आॅगस्ट रोजी दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० आॅगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा
हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: Widespread rain in south Konkan, Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.