डीएसके गेले कुठे? अटक टाळण्यासाठी सपत्निक अज्ञातस्थळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 06:05 PM2017-12-21T18:05:56+5:302017-12-21T19:42:24+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह गायब झाले आहेत. दरम्यान, ही अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

Where did DSK go? Attempted to escape arrest? | डीएसके गेले कुठे? अटक टाळण्यासाठी सपत्निक अज्ञातस्थळी?

डीएसके गेले कुठे? अटक टाळण्यासाठी सपत्निक अज्ञातस्थळी?

googlenewsNext
ठळक मुद्देडीएसके अटक टाळण्यासाठी सपत्नीक अज्ञातस्थळी? पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहितीपोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात नसल्याचा आरोप

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह गायब झाले आहेत. दरम्यान, ही अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. 
डीएसके यांच्या पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ते ‘वाँटेड’ आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली. तर, दुसरीकडे डीएसके यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात नसल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे. 
गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत त्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डीएसकेंविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी अनेक सदनिकाधारकांना सदनिकांचा ताबा दिलेला नाही. डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने देणीदारांची रक्कम कशी देणार, याची माहिती देण्यास तसेच विकता येणा-या मालमत्तांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर डीएसकेंनी १९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांनी रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाने पोलिसांना नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. परिणामी डीएसकेंना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील म्हणाले की, डीएसकेंचा शोध घेत आहोत. शहरातील काही ठिकाणी पोलिसांनी त्यांचा तपास केला. मात्र, ते शहरात नसल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध सुरु असून, ते पोलिसांसाठी वाँटेड आहेत.
 

Web Title: Where did DSK go? Attempted to escape arrest?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.