जेव्हा राजे समरजितसिंह घाटगे जेव्हा पुण्यात रिक्षातून फिरतात... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 08:30 PM2019-06-17T20:30:35+5:302019-06-17T20:38:40+5:30

कागलचे राजे समरजितसिंग घाटगे सहकुटुंब शनिवारी रिक्षातून फिरण्याचा आनंद घेतला. मात्र या भेटीतही कागलची आठवण आल्याचे त्यांनी नमूद केले आहे

When Kagal Raje Samarjitsinh Ghatge travelled through rickshaw in Pune | जेव्हा राजे समरजितसिंह घाटगे जेव्हा पुण्यात रिक्षातून फिरतात... 

जेव्हा राजे समरजितसिंह घाटगे जेव्हा पुण्यात रिक्षातून फिरतात... 

Next

पुणे : सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कुटुंबियांना वेळ देणे दरवेळी शक्य असतेच असे नाही. असेच दृश्य पुण्यात दिसले असून कागलचे राजे समरजितसिंग घाटगे यांनी सहकुटुंब शनिवारी रिक्षातून फिरण्याचा आनंद घेतला. मात्र या भेटीतही कागलची आठवण आल्याचे त्यांनी नमूद केले आहे

 घाटगे हे सध्या शाहू साखर कारखान्याचे प्रमुख असून म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांचे पुण्यात येणे होत असते. मात्र शनिवारी त्यांनी पत्नी निवेदिता आणि मुलगा आर्यवीर यांच्यासोबत रिक्षात प्रवास करून प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर त्यांनी याविषयीची पोस्ट शेअर केली आहे. 

घाटगे यांनी सी. ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे. या काळात पुण्यात त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे पीएमटी आणि तत्सम सार्वजनिक वाहनांनी प्रवास केला आहे. याच आठवणींना त्यांनी उजाळा दिला.ते या पोस्टमध्ये म्हणाले की, पत्नी आणि मुलासोबत पुन्हा एकदा कॉलेजचे दिवस जगण्यास मिळाले. पुण्याचे आराध्यदैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाचे दर्शन घेतले. एक सहज, सोपा दिवस कुटुंबासोबत घालवला आणि मग पहिली आठवण झाली ती माझ्या कागलची. 

Web Title: When Kagal Raje Samarjitsinh Ghatge travelled through rickshaw in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.