'6 हजार रुपयांत कसं पोट भागवणार, जसं पेराल तसंच उगवणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 10:48 PM2019-02-09T22:48:20+5:302019-02-09T22:49:15+5:30

महाआघाडीबाबत बोलताना, रस्सीखेच करण्यापेक्षा शेतकऱ्यांकड लक्ष द्या. मी तुम्हाला सांगण्याइतका मोठा नाही. पण, शेवटी जनतेचा कौल महत्वाचा आहे.

What will be the balance in rupees 6 thousand rupees, ghanshyam darode ask question to government | '6 हजार रुपयांत कसं पोट भागवणार, जसं पेराल तसंच उगवणार'

'6 हजार रुपयांत कसं पोट भागवणार, जसं पेराल तसंच उगवणार'

googlenewsNext

मुंबई - छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडेने आगामी निवडणुकांविषयी भाष्य केलं आहे. तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6 हजार रुपयांवरुनही त्यानं सरकारला प्रश्न विचारले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या सहा हजार रुपयांत कसं पोट भागवणार, जनावरांना चारा कसा देणार, असे म्हणत त्याने मोदी सरकारच्या सहा हजार रुपयांच्या सन्मान योजनंला गाजर असं म्हटल आहे. तसेच सहा हजार रुपयांपेक्षा आम्हाला हमी भाव द्या, अशीही मागणी घनश्याम याने सरकारकडे केली आहे. 

महाआघाडीबाबत बोलताना, रस्सीखेच करण्यापेक्षा शेतकऱ्यांकड लक्ष द्या. मी तुम्हाला सांगण्याइतका मोठा नाही. पण, शेवटी जनतेचा कौल महत्वाचा आहे. कारण, जसं पेराल तसं उगवल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नुसतं बोलू नका, डायरेक्ट क्रिया करा. आमचा शेतकरी भोळा असून लगेचच तुम्हाला तो मतं देतो. आज, शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा नाही. दुध प्रत्येकाला पाहिजे, पण जनावरं जगली तर दुध मिळेल, असे म्हणत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिकडीनं घनश्यामनं आपलं मत मांडलं आहे. तसेच तरुण मुलांनी शेतीचा व्यवसाय स्विकारावा, पण आधुनिक शेती करावी. आधुनिक तंत्रशुद्ध शेतीच आपल्याला वाचवू शकते, असेही त्याने म्हटले. 

दरम्यान, मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतात, पण कर्जमाफी मिळत नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी योजना करते, पण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे सरकारने 6 हजार रुपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी घनश्यामनं केली आहे. 
 
 

Web Title: What will be the balance in rupees 6 thousand rupees, ghanshyam darode ask question to government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.