Maratha Reservation: मराठा अारक्षणासाठी सरकारकडे प्लॅन बी अाहे का ; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:31 PM2018-08-02T18:31:03+5:302018-08-02T18:37:32+5:30

Maratha Reservation: पृथ्वीराज चव्हाण यांनी अाज लाेकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठा अारक्षणापासून ते येणाऱ्या निवडणूका या सर्वच विषयांवर त्यांनी संवाद साधला.

what is plan b about maratha reservation ; asks prithviraj chavan | Maratha Reservation: मराठा अारक्षणासाठी सरकारकडे प्लॅन बी अाहे का ; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Maratha Reservation: मराठा अारक्षणासाठी सरकारकडे प्लॅन बी अाहे का ; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Next

पुणे : मराठा अारक्षणासंदर्भात सरकार मागासवर्गीय अायाेगाच्या निर्णयावर भर देत असून मागासवर्गीय अायाेग मराठा समाजाच्या बाजूनेच निकाल देईल असे गृहित धरले जात अाहे. परंतु मागासवर्गीय अायाेगाने मराठा समाजाला अारक्षण देणे शक्य नसल्याचा अहवाल दिल्यास सरकारकडे प्लॅन बी अाहे का असा थेट सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अाज चव्हाण यांनी लाेकमत कार्याला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बाेलत हाेते. 


    चव्हाण यांनी साधलेल्या संवादात त्यांनी अारक्षणापासून ते 2019 च्या लाेकसभा निवडणूका अशा सर्वच विषयांवर अापले मत व्यक्त केले. मराठा अारक्षणासंदर्भात सरकार वेळ काढूपणा करत असल्याने मराठा अांदाेलन चिघळत असल्याचा अाराेप त्यांनी यावेळी केला. तसेच धनगर अारक्षणाची घाेषणा करुनही त्या समाजाला अारक्षण न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. चव्हाण म्हणाले, इतके मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले परंतु त्यांनी मराठा समाजाच्या अारक्षणासाठी काही केले नाही असा जाे अाराेप केला जाताे, ताे खाेटा अाहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला अारक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली हाेती. त्यावेळच्या बापट अायाेगाने मराठा समाजाला अारक्षण देता येणार नाही असा अहवाल दिला हाेता. याबाबतची साधार माहिती देण्यास बापट अायाेगाने नकार दिला हाेता. त्यावेळी राणे समिती नेमून या अारक्षणासंदर्भात माहिती गाेळा करण्यास सांगितले हाेते. राणे समितीने 20 टक्के मराठा समाजाला अारक्षण देण्यात यावे असा अहवाल दिला हाेता. तसा अाम्ही कायदाही केला. जुलै 2014 मध्ये कायदा हा अद्यादेश रुपाने अाम्ही अाणला. त्यानुसार मराठा समाजातील मुलांना अारक्षण मिळण्यास सुरुवात झाली हाेती. परंतु या अध्यादेशाला काेर्टात अाव्हान देण्यात अाले व ताे अध्यादेश रद्द करण्यात अाला हाेता. ज्या बिलाला काेर्टाने स्थगिती दिली हाेती, त्यात कुठलेही बदल, सुधारणा न करता फडणवीस सरकारने तेच बिल सादर केले. त्यामुळे या सराकारला मराठा समाजाला अारक्षण द्यायची इच्छा अाहे असे वाटत नाही. 

    माेदींच्या कार्यपद्धतीबाबत बाेलताना चव्हाण म्हणाले, माेदी हे हुकुमशाह सारखे वागत अाहेत. त्यांच्या अश्या वागण्याने जनतेबराेबरच भाजपातील काही लाेकही नाराज अाहेत. अात्तापर्यंत झालेली सर्व अांदाेलने ही अार्थिक अांदाेलने अाहेत. तरुणांना अाज नाेकऱ्या मिळत नाहीत. देश वाचावायचा असेल तर भाजपाचा पराभव करावा लागेत. भाजपाचा राज्यात पराभव करण्यासाठी सर्व विराेधीपक्ष एकत्र येतील. देशातही सर्व विराेधी पक्षांना एकत्र अाणण्याचा काॅंग्रेसचा प्रयत्न अाहे. त्यासाठी साेनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विराधी पक्षांचे गठबंधन व्हावे. माेदीेंना पराभूत करण्यासाठी येत्या काळात महाअाघाडी अावश्यक अाहे. 

खालील लिंकवर क्लिक करुन बघा पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1871591109574074&id=132309676835568

Web Title: what is plan b about maratha reservation ; asks prithviraj chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.