पुणे तिथे काय उणे :सिग्नलवरील वाहनचालकांसाठी टाकले कापडी  छप्पर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 10:56 AM2019-05-20T10:56:26+5:302019-05-20T11:05:20+5:30

कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. हजारो  वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत.

What a idea in Pune : Cloth roof for driver on the signal | पुणे तिथे काय उणे :सिग्नलवरील वाहनचालकांसाठी टाकले कापडी  छप्पर

पुणे तिथे काय उणे :सिग्नलवरील वाहनचालकांसाठी टाकले कापडी  छप्पर

Next

पुणे :  कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. हजारो  वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. मध्यवस्तीतील तीन चौकांमधील ७ सिग्नलवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून लवकरच अजून १३ ठिकाणी अशी सुविधा करण्यात येणार आहे. 

यामध्ये पहिल्या टप्प्यात फरासखाना चौक, अप्पा बळवंत चौक, सिटी पोस्ट चौक येथील ७ सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे. फरासखाना चौकात ६० बाय ४० आणि ५० बाय ३० आकाराच्या हिरव्या कापडाचे छप्पर, अप्पा बळवंत चौकामध्ये ३० बाय २०, २० बाय २० आणि ४० बाय २० आकाराचे छप्पर तसेच सिटी पोस्ट चौकामध्ये ६० बाय ३० आणि ४० बाय २० आकाराचे छप्पर लावण्यात आले आहे. प्रत्येकी ३ फूट रुंदीचे कापड शिवून त्याद्वारे मोठे छप्पर तयार करण्यात आले आहे. याशिवाय १२ आणि ४ एमएम आकारच्या दो-यांचा वापर करुन हे छप्पर बांधण्यात आले आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याबाबत रासने म्हणाले, पुण्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलकरीता चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे त्यांच्याकरीता ही सुविधा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला असून त्यांच्या प्रेरणेतून पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुढील काही दिवसात इतरही चौकात अशी सुविधा देण्यात येणार आहे. कापडी छप्परमुळे उन्हाचे प्रमाण कमी झाले असून रस्ते तापण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. 


कापडाचे छप्पर असल्याने आपोआप होतेय वाहतूक नियमांची अंमलबजावणी
प्रत्येक चौकातील सिग्नलवर छप्पर बांधताना वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होईल, याची काळजी कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे संपण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त सावली पडेल, अशा सुविधा करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक देखील झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे रहात आहेत. 

Web Title: What a idea in Pune : Cloth roof for driver on the signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.