खेड तालुक्याचा पश्चिम भाग पर्यटकांनी बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:27 AM2018-08-20T01:27:12+5:302018-08-20T01:27:29+5:30

संततधार पावसाने निसर्ग बहरला; दऱ्याखोऱ्यातून कोसळणारे धबधबे घालताहेत साद

The western parts of Khed taluka emerged as tourists | खेड तालुक्याचा पश्चिम भाग पर्यटकांनी बहरला

खेड तालुक्याचा पश्चिम भाग पर्यटकांनी बहरला

googlenewsNext

चासकमान : खेड तालुक्याचा पश्चिम भाग निसर्गसौंदर्याने खुलला आहे. हे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असल्याने हे सौंदर्य पाहण्यासाठी इतर राज्यातून पर्यटक खेड तालुक्यात येत आहेत. यामुळे खेड तालुक्याचा पश्चिम भागातील भोरगिरी परिसरातील भोरगड, लेणी, गडावरील टाके, बाराही महिने कपारीमध्ये पाण्यात असलेले महालक्ष्मी मंदिर, महादेव मंदिर ही ठिकाणे पर्यटकांनी बहरली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील, आव्हाट, मंदोशी, शिरगाव, चिखलगाव आदी ठिकाणी पावसाने दमदार हजेरी गेल्या काही दिवसांपासून लावली आहे. यामुळे येथील डोंगरदºयातून धबधबे कोसळत आहेत. हे पाणी, चासकमान धरण, कळमोडी धरणाला मिळत असल्याने धरणांचे अफाट पाणलोट क्षेत्र, भिवेगावच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना मोहित करून टाकत आहे. पाबे गावच्या उंच डोंगरावरून कोसळणारा धबधबा व मंदिर, भोरगिरी, डेहेणे, वेळवळी, भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगावर व्यापलेला निसर्गरम्य परिसर, दाट धुके, दाट वृक्षाची वर्दळ, तुडुंब भरलेली भातखाचरे, चासकमान धरण जलाशय पाहण्यासाठी प्रामुख्याने पर्यटक या परिसरात येत आहेत.

राज्यभरातून पर्यटकांची गर्दी
शिरगाव येथील नेकलेस उंच धबधबा पर्यटकांची अद्भूत निसर्गरम्य मने जिंकत असतो. या मुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात धार्मिक, भौगोलिक, कृषीबरोबरच निसर्गाचा पर्यटनाचा पावसाळ्यातील निसर्ग पाहण्यासाठी काही वर्षीपासून पावसाळ्यात आवर्जून पर्यटनाचा खरा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
भोरगिरी परिसरातील क्षेत्र भीमाशंकर देवस्थान असलेल्या देवभूमीला निसर्गाने आपल्या खजिन्यातून अप्रतिम सौंदर्याचं दान भरभरून दिलेलं आहे. महाबळेश्वरसारख्या निसर्गाच्या या निरलस सुंदरतेचा अनुभव ठायी ठायी अनुभवण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चिखलगाव सारख्या गावांना पर्यटक आवर्जून भेट घ्यायला विसरत नाही.

Web Title: The western parts of Khed taluka emerged as tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे