Water supply to Pune city closed on Thursday | पुणे शहराचा पाणीपुरवठा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणे : शहराच्या मध्यवस्तीला पाणीपुरवठा होणा-या पर्वती जलकेंद्राचे पंपिंगचे फ्लोमीटर बसविणे व जोडणीचे काम, वडगाव जलकेंद्राची विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती, एसएनडीटी पंपिंग येथील पाइपलाइन जोडणेचे कामे आदी आदी अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी (दि. ११) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि. १२) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग), वडगाव जलकेंद्र परिसर, चतु:शृंगी, एसएनडीटी परिसर, शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी रोड, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द आदी सर्व भागांत गुरुवारी महापालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पंचवटी, सोमेश्वरवाडीचा काही भाग, रामबाग कॉलनी, गणंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, औध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, गुरूगणेशनगर, सकाळनगर, पुणे विद्यापीठ परिसर पाणीपुरवठा बंद असणार आहे. याशिवाय पर्वती टँकर भरणा केंद्र व पद्मावती टँकर भरणा केंद्र देखील बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.