रातराणीवर राहणार वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 04:02 AM2018-05-20T04:02:48+5:302018-05-20T04:02:48+5:30

पीएमपी सुरक्षा विभाग : गस्तीवरील पोलीसही ठेवणार लक्ष

Watch overnight | रातराणीवर राहणार वॉच

रातराणीवर राहणार वॉच

googlenewsNext

पुणे : रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या रातराणी बससेवेवर करडी नजर ठेवली जाणार आहे. पीएमपीच्या सुरक्षा विभागाच्या पथकासह तिकीट तपासनिसांचे पथक आणि रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांचेही या बसवर लक्ष राहील.
शहरात प्रामुख्याने पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर, कात्रज या भागात बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांची संख्या जास्त असते. पीएमपीची सर्वसाधारण सेवा रात्री साडेअकरापर्यंत असते. त्यानंतर प्रवाशांना रिक्षा किंवा इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हे टाळण्यासाठी पीएमपीने काही वर्षांपासून रातराणी बससेवा सुरू केली आहे. सध्या ६ मार्गांवर ही सेवा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रातराणी बसमध्ये चालक व वाहकाने प्रवाशांशी उद्धट वर्तन केल्याचा प्रकार घडला होता. याची पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित चालक व वाहकावर कारवाई केली. तसेच, रातराणी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
‘पीएमपी’मध्ये एकूण २० तिकीट तपासनिसांची पथके आहेत. तसेच सुरक्षा पथकही आहे. ही पथके रात्री तिकीट तपासणीबरोबरच बसमधील प्रवाशांना येणाºया अडचणींवरही लक्ष केंद्रित करणार आहेत. सर्व पथकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांकडून शहरात गस्त घातली जाते. त्यांनी रातराणी बसच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याबाबतही पोलिसांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली.

चालक-वाहकांचीच जबाबदारी
बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर पुरूष प्रवासी बसू न देण्याची जबाबदारी वाहकांचीच आहे. या जागांवर पुरूष प्रवासी बसलेले असतील आणि महिला प्रवासी उभ्या असतील, तर वाहकांनी महिलांना जागा करून देणे आवश्यक आहे. त्याबाबत वाहक व चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, तिकीट तपासनिसांच्या पथकांना याबाबत सांगण्यात आल्याचे गुंडे यांनी नमूद केले.

Web Title: Watch overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.