पराभवाला वळसे पाटील हेच जबाबदार : आढळराव पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:26 PM2019-05-27T14:26:35+5:302019-05-27T14:36:51+5:30

‘‘अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव; तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला.

walse patil responsible for my lose : aadhalrao patil blame | पराभवाला वळसे पाटील हेच जबाबदार : आढळराव पाटील यांचा आरोप 

पराभवाला वळसे पाटील हेच जबाबदार : आढळराव पाटील यांचा आरोप 

Next
ठळक मुद्देआंबेगाववर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहाकार्यकर्त्यांनी पराभव विसरून पुन्हा कामाला लागावेसहाही मतदार संघांत अगदी भाजप उमेदवारांचाही मी ठासून प्रचार करणार

मंचर  : ‘‘अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव; तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला. या पराभवाला डॉ. कोल्हे जबाबदार नसून वळसे पाटील हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखे दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत होतात. मग वळसे पाटील का पराभूत होणार नाही, आंबेगाव विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा,’’ असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच लांडेवाडी येथे येऊन आढळराव पाटील यांनी जनता दरबारात कार्यकर्ते व नागरिकांच्या भावना समजावून घेतल्या. यावेळी झालेल्या मेळाव्यात ते म्हणाले,देशात मोदी लाट असताना शिरूरमधील पराभवाचे अनेकांना वाईट वाटले, तर काहींना आत्ताच पश्चाताप होतोय. १५ वर्षे जे बरोबर राहिले ज्यांनी साथ दिली, त्यांचे आभार मानत एका पराभवाने घरी बसणे शहाणपणाचे नव्हते. त्यामुळे मतदार संघात राष्ट्रवादीची गुंडगिरी व दहशत वाढली असती. म्हणून पुन्हा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आलो आहे. एका व्यक्तीच्या प्रतिमेचा, मालिकेचा प्रभाव व जातीच्या समीकरणामुळे निवडणुकीत पराभव झाला. मालिका पाहणाऱ्या महिलांनी राजाला मतदान करायचे, असे म्हणत समोरच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे वैयक्तिक कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. यापूर्वीही मी थांबलो नाही व आताही थांबणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पाठवून सरकार तुमच्या पाठीशी असून कामांना प्राधान्य राहील, असे आश्वासन दिले आहे. 
आमदार सुरेश गोरे म्हणाले, की आढळराव पाटील यांचा या निवडणुकीत नैतिक विजय झाला आहे. मतदारांनी विकासापेक्षा प्रतिमेला महत्त्व दिले. कार्यकर्त्यांनी पराभव विसरून पुन्हा कामाला लागावे, दादा पुन्हा खासदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
...........
निवडणुकीत बैलगाडा, विमानतळ, वाहतूककोंडी हे प्रश्न बाजूला पडून केवळ जातीय समीकरणे व मालिका हा फॅक्टर चालला. यात माळी समाजाला दोष देऊन उपयोग नाही. ही पाच वर्षे अशी निघून जातील.४ महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे. सहाही मतदार संघांत अगदी भाजप उमेदवारांचाही मी ठासून प्रचार करणार आहे.   
    - शिवाजीराव आढळराव पाटील
........
४जनता दरबार सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाºयांबाबत तक्रार केली. निवडणुकीत त्यांनी चांगले काम केले नसल्याने पराभव झाला, असे कार्यकर्ते सांगत होते. हा मुद्दा आढळराव पाटील यांनी खोडून काढला. मागील ३ निवडणुकांमध्ये जसे कार्यकर्ते काम करत होते, तसेच त्यांनी यावेळी केले आहे. 
४त्यांना दोष देऊन उपयोग नाही. समोर अभिनेता उमेदवार असल्याने पराभव झाला आहे. इतरांवर दोष देण्यापेक्षा यापुढील काळात येणाºया विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना आढळराव पाटील यांनी दिली.

Web Title: walse patil responsible for my lose : aadhalrao patil blame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.